Headlines

‘द कपिल शर्मा शो’ लवकरच ऑफ एअर होणार, कारण…

[ad_1]

The Kapil Sharma Show Soon To Off-Air: रोजचा ताणतणाव आणि मनावरील थकवा दूर करण्यासाठी कॉमेडी शो आवडीने पाहीले जातात. सध्या ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी कार्यक्रमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण लवकरच ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम ऑफ एअर होणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. पण काळजी करू नका, हा शो काही काळासाठी बंद होणार आहे. कपिल शर्माने या कार्यक्रमातून छोटासा ब्रेक घेतला आहे. वास्तविक, होस्ट कपिल शर्मा आणि त्याची टीम कामानिमित्त अमेरिकेला जाणार आहे. 23 एप्रिल 2016 रोजी प्रीमियर झालेल्या या शोचे आतापर्यंत तीन सीझन झाले आहेत आणि तिसरा सीझन 5 जून रोजी संपला आहे.

कार्यक्रमात कपिल आणि बॉलिवूड सेलिब्रिटी यांच्यातील मजेदार विनोदांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. बॉलिवूड कलाकार सहसा त्यांच्या नवीन चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी या कार्यक्रमाला भेट देतात. यावेळी चित्रपटांच्या गप्पा गोष्टींसह मजेदार किस्सेही शेअर केले जातात.

2016 मध्ये आलेल्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये शाहरुख खान  पहिला पाहुणा कलाकार होता. शाहरुख त्याच्या ‘फॅन’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. नंतर, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, यो यो हनी सिंग, अक्षय कुमार, अजय देवगण, यामी गौतम, वीरेंद्र सेहवाग, धर्मेंद्र आणि अशा अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये विशेष पाहुणे म्हणून हजेरी लावली.

या कार्यक्रमात नवज्योत सिंग सिद्धू कायमस्वरूपी पाहुणे म्हणून यायचे पण नंतर त्यांची जागा अर्चना पूरण सिंह यांनी घेतली. वास्तविक सुनील ग्रोव्हरनेही होस्टसोबत काही मतभेद झाल्यानंतर कार्यक्रम सोडला होता. नुकत्याच संपलेल्या सीझनमध्ये कॉमेडियन किकू शारदा, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि सुमोना चक्रवर्ती होते.

शेवटच्या एपिसोडमध्ये कमल हसन पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत. कमल हासन त्यांच्या ‘विक्रम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते आणि ‘अप्पू राजा’ बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाबद्दल बोलले आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *