Headlines

‘ही’ बोल्ड सीरिज एकांतात पाहण्यासाठी अनेकजण घेतात Netflix चं सब्सक्रिप्शन

[ad_1]

मुंबई : Netflix वर बऱ्याच वेब सीरिज आजवर प्रदर्शित झाल्या आहेत. यातील काही वेब सीरिज या कलाकारांच्या अभिनयासाठी, तर काही कथानकांसाठी गाजल्या. काही सीरिज या त्यांच्या सिनेमॅटोग्राफीसाठीही चर्चेत आल्या. पण, एक अशीही वेब सीरिज आहे जी या निकषांसोबतच आणखी एका कारणामुळे प्रचंड चर्चेत आली. (Netflix Hindi Boldest Web Series on sacred games)

बरेच बोल्ड सीन असणाऱ्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान या आणि अशा इतरही कलाकारांच्या भूमिका होत्या. या सीरिजचं नाव आहे, ‘सेक्रेड गेम्स’. 

नेटफ्लिक्सवर आतापर्यंत बऱ्याच भाषांमधील सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. पण, त्यातही नेटफ्लिक्स हिंदीवर आलेल्या या सीरिजनं प्रेक्षकांना एकाच जागी खिळवून ठेवलं. 

अभिनेत्री राजश्री देशपांडे आणि नवाजमधील बरेच बोल्ड सीन या सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहेत. या सीनमुळे प्रत्येक वेळी ही सीरिज पाहताना आपल्या आजुबाजूला घरातलं कुणी मोठं किंवा अल्पवयीन सदस्य नाहीत याची काळजी अनेकजण घेताना दिसतात. 

2018 मध्ये या सीरिजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. यानंतर या सीरिजच्या दुसऱ्या पर्वानंही चाहत्यांच्या नजरा वळवल्या. विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीवर या सीरिजचं कथानक आधारलेलं आहे. 

अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं. समलैंगिक संबंधांसोबत गँगवॉर आणि एका वेगळ्याच थराररक कथेला या सीरिजच्या निमित्त हात घालण्यात आला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *