Headlines

‘तुझ्या बायकोला नाव सांगू का?’ चाहत्याच्या कमेंटवर कुशल बद्रिकेची कमेंट, म्हणाला…

[ad_1]

Kushal Badrike Cryptic Post : प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि आपल्या हटके डान्स स्टाईलसाठी अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून तो सतत चर्चेत असतो. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून तो घराघरात पोहचला. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणूनही कुशलला ओळखले जाते. आता कुशलच्या एका पोस्टवरील कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. आता कुशलने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात फोटोत तो मुंबई विमानतळावर बसलेला पाहायला मिळत आहे. कुशलने यासोबत या पोस्टला कॅप्शन दिले आहे. त्याची कॅप्शनही चर्चेत आहे. 

कुशल बद्रिकेची पोस्ट

“शोधून सापडणार नाहीत”, काही अशी माणसं आयुष्यातून निघून गेली ना, की माणसं “एकलकोंडी” होत जातात. फक्त स्वतःची होत जातात, स्वतः मधेच रमत राहतात. आणि मग, आयुष्यातून आणखीन माणसं गमाऊन बसू ह्या भीती पोटी हे लोक माणसं कमवायचीच राहून जातात. अश्या एकाकी माणसांना त्यांच्यावर सच्च प्रेम करणारं कुणीतरी हवं असतं. बास !, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे. 

कुशलच्या या पोस्टवर एका चाहत्याने हटके कमेंट केली आहे. त्यावर एकाने “मागे वळून कोणाला पाहत आहेस, सांगू का तुझ्या बायकोला नाव…?” अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. त्यावर कुशलने हसण्याचा इमोजी पोस्ट करत त्या चाहत्याला उत्तर दिले आहे. तसेच अभिनता पुष्कर जोगनेही यावर कमेंट केली आहे. “मी अजूनही आहे, मला तुझी खूप आठवण येते. पण तू व्यस्त असशील म्हणून तुला त्रास देत नाही. आय लव्ह यू कुश्या”, असे पुष्कर जोगने म्हटले आहे. त्यावर कुशलने हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. 

Kushal Badrike

आणखी वाचा : ‘काय खाऊन जाड्या झालात?’ नेटकऱ्याच्या प्रश्नाला मेघा धाडेचे जशास तसं उत्तर, म्हणाली ‘तुझ्या पिताश्रींचं…’

दरम्यान, कुशलच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तो आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटात झळकला आहे. ‘पांडू हवालदार’, ‘बाप माणूस’, ‘स्लॅम बूक’, ‘रावरंभ’ या चित्रपटातील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. आता लवकरच कुशल हा एका हिंदी कॉमेडी शो मध्ये झळकणार आहे. मॅडनेस मचाऐंगे या विनोदी कार्यक्रमात तो झळकणार आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *