Headlines

Danny Denzongpa Birthday : जया बच्चन यांनी दिलं होतं ‘डॅनी’ असं नाव, डॅन्झोंगपा यांचं खरं नाव काय?

[ad_1]

Danny Denzongpa Birthday : बॉलिवूडमधील चित्रपट जेवढा अभिनेता आणि अभिनेत्रीमुळे गाजतो आज तो तेवढ्याच खलनायकातील अभिनेत्यांचा अभिनयानेही हिट होतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार होते जे अभिनेता म्हणून नाही तर खलनायक म्हणून प्रेक्षकांना जास्त आवडले. त्यातील एक नाव होतं डॅनी डँग्झोपा. डॅनीने हिंदीसोबत नेपाळी, तमिळ, तेलुगू आणि हॉलिवूडमध्ये काम केलं. सिक्कीमहून मुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी आलेला डॅनी त्याचा आज 75 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यातील तुम्हाला माहिती नसलेले किस्से आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

डॅनीला मिळाली गार्ड नोकरीची ऑफर!

अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या डॅनीला दिग्दर्शकाने गार्डची नोकरी ऑफर केली होतो. झालं असं की, डॅनी मोहन कुमारच्या बंगल्यावर गेले असता तिथे सिक्कीमचे अनेक गार्ड असल्याने त्याला बंगल्यात सहज प्रवेश मिळाला. बंगल्यात प्रवेश मिळाल्यावर त्याने दिग्दर्शकाकडे अभिनेता होण्याची इच्छा व्यक्ती केली.

हे ऐकून मोहन कुमार यांना हसू आलं. त्यावेळी मोहन यांनी डॅनीला सांगितलं मी एक बंगला बांधणार आहे. तिथे तुला गार्डची नोकरी देतो. डॅनीला रागला आणि त्याने मोहन कुमारच्या बंगल्याच्या बाजूला जमीन खरेदी केली आणि तिथे स्वत:चा बंगला बांधला. 

जया बच्चन यांनी ठेवलं डॅनी हे नाव!

डॅनीला अभिनयाशिवाय भारतीय सैन्यदलात जाण्याची इच्छा होती. अभिनेत्याला लहानपणापासूनच घोड्यांची आवड होती. पण भारत – चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आईने त्यांना सैन्यदला भरती होण्यास मनाई केली. पुढे त्यांनी पुण्यातील एफटीआयआयमध्ये अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तिथे डॅनीच्या नावाची खिल्ली उडवली जायची. तेव्हा त्याची बॅचमेट जया भादुरी म्हणजे आजची जया बच्चन यांनी त्याचं नाव डॅनी ठेवलं. आज त्याला बॉलिवूडमध्ये डॅनी नावानेच ओळख निर्माण केली. 

डॅन्झोंगपा यांचं खरं नाव काय?

डॅनी डेन्झोपा यांचं खरं नाव हे भलेमोठे होतं. एवढंच नाही तर ते उच्चार करण्यासाठी देखील खूपच कठीण होतं. Tshering Phintso Denzongpa (शेरिंग फिंटसो डेन्झोपा) असं डॅनीचं खरं नाव आहे. खरं बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेता आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये येण्यासाठी आपलं नाव बदललं. 

‘या’ चित्रपटातून करिअरला सुरुवात!

जरुरत हा डॅनीचा पहिला चित्रपट होता. पण मेरे अपने या चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली. तर धुंद या चित्रपटातून त्याने खलनायकाच्या भूमिकेला सुरुवात केली.

त्यानंतर चोर मचाये शोर, फकिरा, देवता, काला सोना, अग्निपथ, हम, सनम बेवफा, क्रांतीवीर, विजयपथ, खुदा गवाह, बरसात, घातक यासारखे अनेक चित्रपटात उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फिर वही रात, राम यांसरख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही डॅनीने केले. एवढंच नाही तर काला सोना, नया दौर यांसारख्या चित्रपटांमध्ये गाणी देखील त्याने गायली आहेत. 

 [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *