Headlines

‘मराठीत कुणीच सुपरस्टार नाही…’, गश्मीर महाजनीच्या ट्वीटने वेधलं लक्ष

[ad_1]

Gashmeer Mahajani No superstar Tweet : मराठी चित्रपटांसह अनेक हिंदी मालिका व रिअॅलिटी शोमध्ये काम करून प्रचंड लोकप्रियता मिळवलेला अभिनेता म्हणून गश्मीर महाजनीला ओळखले जाते. ‘देऊळबंद’ या चित्रपटामुळे तो घराघरात पोहोचला. त्याने अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या गश्मीर हा त्याच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आला आहे. मराठीत कुणीच सुपरस्टार नाही, असे वक्तव्य त्याने केले आहे. 

गश्मीर महाजनी हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. गश्मीर हा विविध फोटोशूटही करताना दिसतो. या फोटोशूटचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता नुकतंच गश्मीर महाजनीच्या एका ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. गश्मीरच्या एका चाहत्याने त्याच्या फोटोशूटमधील ठराविक फोटो घेऊन शेअर केले आहेत. त्या फोटोवर “मराठी सिनेअभिनेते सुपरस्टार गश्मीर महाजनी” असं लिहिण्यात आलं आहे. यावेळी चाहत्याकडून गश्मीरचा उल्लेख ‘सुपरस्टार’ असा करण्यात आला आहे. त्यावर गश्मीरने प्रतिक्रिया दिली आहे. 

गश्मीर महाजनी काय म्हणाला?

“प्लिज सुपरस्टार मला म्हणू नका… अजून सुपरस्टार व्हायला वेळ आहे. आता मराठीत कुणीच सुपरस्टार नाही. पण एक दिवस होणार नक्की.. सुपरस्टार तो असतो जो रस्त्यावरून चालला की सर्वलोक कपडे फाडतात… नक्की होणार … माझं वचन आहे. पण आत्ता इतकं सहज कुणाला सुपरस्टार म्हणू नका” असे गश्मीर महाजनीने ट्वीट करत म्हटले आहे. 

“कदाचित माझ्या बोलण्याला शब्दशः घेतलं”

गश्मीरच्या या ट्वीटवर एकाने कमेंट केली आहे. “मराठी लोकं सुशिक्षित असल्यामुळे ते रस्त्यानी कपडे फाडतील वगैरे असं काही होणार नाही! हो पण आम्हाला तुमची कला आवडली तर टाळ्यांचा गजर नक्की करू! सुसंस्कृत पद्दतीने सुद्धा व्यक्त होता येते!!!!” असे त्या चाहत्याने म्हटले आहे. तर त्यावरही गश्मीरने प्रतिक्रिया दिली आहे. “अरे मित्रा कपडे फाडतात हे metaphorically बोल्लो आहे. तुझ्याकडे पाहता लक्षात येतं कि तू वयाने लहान आहेस म्हणून कदाचित माझ्या बोलण्याला शब्दशः घेतलं आहेस. असो … तुझ्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा”, असे गश्मीरने म्हटले आहे. 

गश्मीरच्या या ट्वीटची सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. गश्मीर हा देऊळ बंद, कान्हा, सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात झळकला होता. मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी मनोरंजनसृष्टीतही गश्मीरनं विशेष ओळख निर्माण केली आहे. इमली, तेरे इश्क़ में घायल या हिंदी मालिकांमध्ये तो झळकला. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *