Headlines

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीनं ‘तू चाल पुढं’ मालिकेतून अचानक घेतली एक्झीट!

[ad_1]

Tu Chal Pudha : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री दीपा परब सध्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्वत: ची एक जागा निर्माण केली आहे. काही काळातच या मालिकेनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेत दीपाच्या भूमिकेच्या अवतीभोवती कथानक फिरत असले तरी देखील इतर कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, या कलाकारातील एका कलाकारानं मालिकेला राम राम केला आहे. याविषयी त्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याविषयी सांगितलं आहे. 

या मालिकेतून बाहेर पडणारी अभिनेत्री म्हणजे स्नेहा माजगावकर. या मालिकेत स्नेहा माजगावकरनं प्राजक्ता पांडे ही भूमिका साकारली होती. प्राजक्ता पांडे ही अश्विनीची खूप चांगली आणि जवळची  मैत्रीण असते. पण स्नेहानं अचानक मालिकेला राम राम केल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. स्नेहानं याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. स्नेहानं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये स्नेहानं तिचा सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतील तिच्या सगळ्या आठवणी पाहायला मिळत आहे.  हा व्हिडीओ शेअर करत स्नेहानं कॅप्शन दिलं की ‘यादों की अलमारी, Being Praju, Ps : सिरिअल संपत नाहीये मी या पुढे सीरियल मध्ये नसेन…..’. या व्हिडीओत स्नेहासोबत फक्त तिचे सहकलाकार नाही तर सेटवर असलेले अनेक क्रु मेंबर्स देखील आहेत. स्नेहानं शेअर केलेल्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे स्नेहानं असं का केलं मालिका का सोडली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

स्नेहाच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, किती गोड आठवणी आहेत या. दुसरा नेटकरी म्हणाला, अगं ताई पण का… खूप छान अभिनय करतेस तू. तिसरा नेटकरी म्हणाला, भूमिका रिप्लेस होणार आहे का? काही नेटकऱ्यांनी का मालिका सोडलीस असा प्रश्न विचारला आहे. 

हेही वाचा : रजनीकांत यांचा ‘जेलर’ पाहणार का? किंग खानच्या उत्तरानं जिंकली सगळ्यांची मनं

‘तू चाल पुढं’ या मालिके विषयी बोलायचे झाले तर या मालिकेत दीपा परब ही अश्विनी ही भूमिका साकरते. दीपा बऱ्याच काळानंतर मालिकेत परतली आहे. दीपा सोबतच या मालिकेत धनश्री कोडगावकर, आदित्य वैद्य, पीहू गोसावी, देवेंद्र दोडके या कलाकारांच्या देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *