Headlines

‘बाईपण भारी देवा’च्या यशाने सुकन्या मोने झाल्या श्रीमंत; हा इमोशनल व्हिडीओ पाहाच

[ad_1]

मुंबई : केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा सध्या उंचीच्या शिखरावर आहे. सिनेमा रिलीज होवून जवळपास दीड महिना झालाय मात्र या सिनेमावर प्रेक्षक आजही तितकंच प्रेम करत आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. असं असताना या सिनेमातील कलारांवरही प्रेक्षक तितकंच प्रेम करताना दिसत आहेत. याआधी सिनेमागृहाच्या बाहेर महिला नऊवारी त्यावर गॉगल अशा पेहरावात दिसल्या होत्या. या सिनेमाला केवळ महिला वर्गांनीच नव्हेतर प्रत्येक वर्गाने डोक्यावर घेतलंय. आता नुकताच सुकन्या मोने यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओत सुकन्या मोने त्यांच्या बालपणीच्या मैत्रिणींना भेटताना दिसत आहेत. सुकन्या मोने यांच्या बालपणीच्या मैत्रिणी एकत्र येवून त्यांचं कौतूक सोहळा करताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या सुरुवातीला सुकन्या मोने एन्ट्री घेताना दिसत आहे. जेव्हा त्या घरी येतात. तेव्हा त्यांच्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करताना दिसत आहेत. त्यांनंतर सगळ्याजणी त्यांचं औकक्षण करतात. मग सगळ्याजणी त्यांची साडी आणि खणा नारळाने ओटी भरतात. आणि नंतर केक कट करतात. हा सगळा कौतूक सोहळा पाहून सुकन्या माने ईमोशनल झाल्याचं दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

हा व्हिडिओ शेअर करत सुकन्या मोने यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय की, ”बाईपण भारी देवा! ” ला घवघवीत यश प्राप्त झालंय आणि अजूनही होतय…. होईल…. सगळीकडे संपूर्ण team चे कौतुक होतय…. पण जेव्हा आपल्या माहेरच्या बालमैत्रिणी आपल्याला surprise देतात…. साडी ने ओटी भरतात…. नानाविध स्वतःच्या हाताने केलेली कलाकृती भेट म्हणून देतात…. लेख लिहितात…. गॉगल लाऊन फोटो काढतात आणि आवडते खाद्यपदार्थ करतात….. माझ्या फोटोंचे मास्क लाऊन माझे स्वागत करतात….. 

औक्षण करतात …. केक आणतात ….. कित्ती कित्ती आणि काय सांगू…. ज्या काकूंनी लहानपणापासून पाहिले आहे त्या पत्राद्वारे कौतुक,प्रेम,आशीर्वाद देतात तेव्हा जगातील सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाल्या सारखा वाटतो….. त्यांचे प्रेम …. आपुलकी…. मायेचा ओलावा…. हीच माझी खरी कमाई आहे…… खूप खूप श्रीमंत झालेय मी….. ह्याच्यापेक्षा freindship day च्या उत्तम शुभेच्छा काय असू शकतात!! वर्षा,माधवी,साधना,सुचेता,अनु,मृणाल, निवेदिता,जयश्री ताई,मंगल आणि तिचे कुटुंब.  सध्या सुकन्या मोने यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यांचे चाहते त्यांच्या या पोस्टवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *