Headlines

Shah Rukh Khan आणि पत्नी गौरी खानमध्ये भर कार्यक्रमात भांडण? व्हिडीओ चर्चेत

[ad_1]

Shah Rukh Khan and Gauri Khan Fight : बॉलिवूडचा किंग खान आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांची जोडी ही लोकप्रिय कप्लसपैकी एक आहे. शाहरुख आणि गौरी हे दोघे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. शाहरुख हा नेहमीच समोरच्या व्यक्तीसोबत आदरपूर्णपणे वागतो. पण तुम्हाला माहितीये का? सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तो नक्की शाहरुखच आहे का? असा सवाल त्याच्या चाहत्यांना पडला आहे. खरंतर शाहरुख आणि गौरीचा हा व्हिडीओ नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमातील (Nita Mukesh Ambani Cultural Centre) आहे. यावेळी शाहरुखनं डान्स केला होता. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत शाहरुख आणि गौरी भांडताना दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. 

शाहरुख आणि गौरी या दोघांचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या सेलिब्रिटी फोटोग्राफरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांच्या या व्हिडीओत शाहरुख आणि गौरी हे दोघं बोलत आहेत. पण शाहरुख यावेळी रागात असल्याचे दिसत आहे. इतकंच काय तर शाहरुखला कुठे तरी जायचं असतं तर गौरी त्याला समजावत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसते. दरम्यान, या कार्यक्रमात, स्टेजवर कोणी डान्स करत असताना बॅकग्राऊंडला खूप आवाज सुरु होता. त्यामुळे देखील त्यांना मोठ्यानं बोलावे लागत असेल असे काही लोक म्हणतात. (Shah Rukh Khan and Gauri Khan Fight) 

शाहरुख आणि गौरीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्यानं कमेंट केली की पती-पत्नीमध्ये भांडण ही सुरुच असतात. त्यात काही नवीन नाही. त्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारची बातमी करण्याची गरज नाही. त्यांना एकटं सोडा. दुसरा नेटकरी म्हणाला, असं वाटतंय की गौरी त्याला बोलते की माझ्यासोबत डान्स कर आणि शाहरुख बोलत आहे की खूप उशिर झाला आहे घरी जाऊया. तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, मी नव्हतो तर तू सलमानसोबत फोटो का काढला. दरम्यान, शाहरुख आणि गौरीच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध कमेंट करत आहेत. 

हेही वाचा : ‘हम हम है बाकी सब…’ बॉलिवूडमधल्या तरुण अभिनेत्यांविषयी Salman Khan म्हणतो…

दरम्यान, NMACC मध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार शाहरुख खान, सलमान खान, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि आमिर खाननं हजेरी लावली होती. तर हॉलिवूड कलाकारांविषयी बोलायचं झालं तर जिंडाया, निक जोनस, गीगी हदीद, पेन्लपी क्रुज आणि टॉम हॉलंड सारख्या मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. त्या सगळ्यांचे NMACC मधील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *