Headlines

‘हम हम है बाकी सब…’ बॉलिवूडमधल्या तरुण अभिनेत्यांविषयी Salman Khan म्हणतो…

[ad_1]

Salman Khan On Young Actors Raising Their Fees : बॉलिवूडचा भाईजान आणि अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा नेहमीत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, सलमान सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले. त्याचं चर्चेत असण्याचं कारण हे फिल्मफेयर अवॉर्ड्स प्रेस कॉन्फरन्स 2023 आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल की असं काय झालं की सलमान चर्चेत आला आहे. या कॉन्फरन्समध्ये सलमान त्याच्या जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या धमकीवर आणि तरुण कलाकारांचे चित्रपटसृष्टीत काम करण्यापासून त्यांचे मानधन वाढवण्यावर वक्तव्य केलं आहे. 

सलमान खाननं फिल्मफेअर आधी होणाऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हजेरी लावली होती. यावेळी हा खुलासा करण्यात आला की सलमान खान हा यंदाच्या वर्षी फिल्मफेअर अवॉर्ड होस्ट करणार आहे. यावेळी तरुण कलाकारांकडून मिळणाऱ्या स्पर्धेवर सलमाननं त्याच्या शब्दात उत्तर दिलं आहे. 

सलमान यावेळी मुलाखतीत म्हणाला, ते सगळी खूप मेहनती आणि टॅलेंटेड आहेत. पण मला असं वाटतं की आम्ही पाच त्यांना अशा प्रकारे सोडणार नाही आहोत, म्हणजेच शाहरुख, आमिर, मी, अक्की आणि अजय. आम्ही त्या लोकांच्या पैशांवर दाव लावू आणि त्यांना पळवून पळवून थकवू. आमचे चित्रपट चालतात, आम्ही मानधन वाढवतो. तर जेव्हा आम्हाला चित्रपट मिळत नाहीत किंवा आम्ही चित्रपट करत नसतो, तेव्हा ते त्यांचं मानधन वाढवतात. आम्ही बॉलिवूडमध्ये इतक्या लवकर हार मानणार नाहीत. त्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सलमानला पुढे त्याला मिळत असलेल्या जीवेमारण्याच्या धमकीविषयी विचारता तो म्हणाला, ‘मैं सब का भाई नहीं हूं, किसी का भाई हूं और किसी की जान भी हूं.’ (Shah Rukh Khan, Salman Khan, Akshay Kumar, Aamir khan and Ajay Devgn)

हेही वाचा : हनुमान जयंतीच्या निमित्तानं Adipurush सिनेमाचे पोस्टर रिलीज, ‘हा’ लूक पाहून नेटकरी संतप्त

सलमान खान कॉन्फरन्समध्ये तरुण कलाकार कशा प्रकारे मानधन वाढवतात यासोबतच ओटीटीवर असलेल्या सेन्सॉरशिपविषयी देखील बोलला आहे. सलमान लवकरच त्याचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ च्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे. त्याचा हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्याचा हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘किक 2’ आणि ‘टाइगर 3’ या चित्रपटांमध्येही सलमान दिसणार आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *