Headlines

Dasara vs Bholaa Box Office Collection : ‘दसरा’चा ‘भोला’ला बॉक्स ऑफिसवर धोबीपछाड

[ad_1]

Dasara vs Bholaa Box Office Collection Day 7: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘भोला’ (Bholaa) आणि दाक्षिणात्य नानी स्टारर ‘दसरा’ (Dasara) या चित्रपटांमध्ये सध्या बॉक्स ऑफिसवर लढाई सुरु आहे. कलेकश्नच्या बाबतीत बोलायचं झालं तर ‘दसरा’ चित्रपटानं 100 कोटींच्या आकडा पार केला आहे. तर ‘भोला’ या चित्रपटानं आतापर्यंत 50 कोटींचा आकडा क्रॉस केला आहे. त्यामुळे त्या दोघांची आता तुलना सुरु आहे. आता त्या दोघांच्या 7 व्या दिवसाच्या कलेक्शनविषयी आपण जाणून घेणार आहोत. 

भोलानं बॉक्स ऑफिसवर पाच दिवसात 48.78 कोटींची कमाई केली आहे. मात्र, चित्रपटानं सहाव्या दिवशी 4.50 कोटींची कमाई केली. त्यामुळे आता चित्रपटानं एकूण 59.50 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे तर ‘दसरा’ चित्रपटानं सहा दिवसात 64.80 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात दसरानं 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पण भोला हा आकडा लवकर पार करू शकेल याची अपेक्षा खूप कमी आहे. 

अभिनेता नानी आणि कीर्ती सुरेशचा ‘दसरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. खरंतर जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तेव्हा पासून प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली होती. अनेक सेलिब्रिटींनी ‘दसरा’ ची स्तुती केली आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. या चित्रपटात नानी, कीर्ती सुरेश आणि धीक्षीत शेट्टी, शाइन टॉम चाको, समुथिरकानी आणि साई कुमार देखील आहे. त्या सगळ्यांनी केलेल्या या अप्रतिम अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहे. दसरा हा चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं सगळ्यात जास्त कमाई कोणत्या भाषेत केली असेल तर ती तेलगू भाषेत केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आंध्र प्रदेश आणि तेलंगना राज्यात हाचित्रपट सगळ्यात जास्त प्रेक्षकांनी पाहिला. 

हेही वाचा : Shah Rukh Khan आणि पत्नी गौरी खानमध्ये भर कार्यक्रमात भांडण? व्हिडीओ चर्चेत

दरम्यान, ‘भोला’ या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमाला पॉल आणि गजराज राव हे कलाकार आहेत. 2019 साली प्रदर्शित झालेला ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा हा ऑफिशियल हिंदी रिमेक आहे. ‘कैथी’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे. तर ‘भोला’ हा चित्रपट रामनवमी निमित्तानं 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून त्याची चांगलीच चर्चा सुरु होती. चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *