Headlines

बार्शीतील यशोदा पार्क येथे बालदिन मोठ्या उत्साहात सहसंकल्प साजरा

बार्शी /प्रतिनिधी :एक सुजाण व निसर्गाशी नातं जोडून जगणारा माणूस घडणं ही आज काळाची गरज आहे.याच अनुषंगाने बार्शी येथील कासारवाडी रोड लगत असलेल्या यशोदा पार्क मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीच्या औचित्याने 14 नोव्हेंबर बालदिन हा एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यशोदा पार्क मधील बागेत जून मध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली होती…

Read More

बार्शीच्या मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात फौजदारी नोटिसा

बार्शी – बार्शीतील रस्ते व गटारीच्या दुरवस्थेमुळे स्वच्छतेचे अनेक प्रश्न सातत्याने निर्माण झाले आहे.मागील तीन वर्षापासून खड्डेमय रस्ते, गलिच्छपणा, अस्वच्छता या विरोधात सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे व दीनानाथ काटकर यांनी मोठा कायदेविषयक लढा उभा केला आहे.शक्य त्या कायदेशीर मार्गाचा वापर करून त्यांनी बार्शीतील खड्डे व अनियोजित गटार या विरोधात विविध तक्रारी तसेच न्यायालयात याचिका दाखल…

Read More

लखिपुर खेरी येथील शहीद शेतकरी , पत्रकार यांच्या अस्थीकलशाला बार्शीकरांनी केले अभिवादन

बार्शी / प्रतिनिधी– उत्तर प्रदेश येथील लखिपुर खेरी येथे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाने शेतकरी, पत्रकाराच्या आंगावरती गाडी घालून चिरडून टाकलेल्या शहिदांना अभिवादन करणारी सभा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटना तसेच अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृह येथे 11 नोव्हेंबर 2021 रोजी झाली. सोलापूर जिल्ह्यामध्ये ही शहीद अस्थी कलश यात्रा आली असता रिधोरे या गावांमध्ये…

Read More

मटक्याच्या आकड्यांप्रमाणे नको, कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्या- गायकवाड

प्रतिनिधी । बार्शी– येथील शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम मिळत नसल्याने, शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली घेराव आंदोलन करण्यात आले, बस स्थानका शेजारी असलेल्या आयसीआयसीआय लोंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात हे आंदोलन पार पडले. यावेळी बोलतांना गायकवाड म्हणाले, राज्यातील सर्व पिक विमा कंपन्या या बड्या उद्योगपतींच्या असून त्या दरवर्षी शेतकऱ्यांचे पैसे लुटून स्वतःच्या तिजोऱ्या…

Read More

आ. संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने एक दिवस काम बंद आंदोलन

बार्शी – आमदार संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दल अपशब्दचा वापर केल्याने त्यांचावर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन बार्शी यांच्या वतीने बार्शीचे तहसीलदार सुनिल शेरखाने यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की औरंगाबाद येथे दिनांक ०८/११/२०२१ रोजी महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते. साlदर कार्यक्रमामध्ये आमदार…

Read More

नांदेड – पनवेल गाडीला बार्शी येथे थांबा द्यावा , लवकरात लवकर पादचारी पूल बांधण्यात यावा – रेल्वे प्रवासी ग्रुप

बार्शी – उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर यांना रेल्वे प्रवासी ग्रुप बार्शी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. बार्शी कृषि उत्पन्न बाजार समिति च्या विविध विकास कामाच्या लोकार्पन सोहोळ्याच्या निमित्त खासदार ओमराजे निंबाळकर बार्शी मध्ये आले होते. यावेळी रेलवे प्रवासी सेल चे अध्यक्ष शैलेश वखारिया यांनी त्यांच्याशी बार्शी परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या व…

Read More

महाराष्ट्र युवक काँग्रेसची बार्शी विधानसभा निवडणूक जाहीर , तालुकाध्यक्ष पदासाठी राकेश नवगिरे यांचे नाव आघाडीवर

बार्शी / प्रतिनिधी– महाराष्ट्रात युवक काँग्रेसची निवडणूक जाहीर झाली असून, १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या दरम्यान सदस्य नोंदणी व मतदान होणार असून ऑनलाईन पद्धतीने मतदान होणार आहे, सध्या बार्शी तालुक्यातून 3 जणांनी युवक कॉंग्रेस बार्शी विधानसभा तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असून राकेश नवगिरे, निखिल मस्के, अक्षय कोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये…

Read More

लाखीमपुर खेरी येथील शेतकरी हत्याकांडातील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश येणार बार्शीत

बार्शी / प्रतिनिधी -उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे झालेल्या चार शेतकरी हत्याकांडाच्या मधील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश दिनांक 11 नोव्हेंबर 2021 गुरुवार रोजी बार्शी तालुक्यामध्ये येणार आहे. पुणे कोल्हापूर मार्गे निघालेला हा अस्थिकलश श्रीपतपिंपरी येथे प्रथमतः येऊन तेथे त्याला अभिवादन केले जाईल. पुढे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता शहीद शेतकरी अस्थिकलशाला अभिवादन करणारी सभा…

Read More

प्रविण मस्तुद यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर.

बार्शी / प्रतिनिधी- प्रविण मच्छिंद्र मस्तुद यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांची पीएच.डी. पदवी दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर करण्यात आली. वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन या विषयामध्ये त्यांनी ही पदवी संपादित केली आहे. “मराठी भाषिक वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या व्यंगचित्र सदराच्या संदेशातून प्रसारित होणाऱ्या मूल्यांचा वाचकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास.” या शोधविषयाच्या प्रबंधास विद्यापीठाने मान्यता दिली असल्याचे…

Read More

अंगावर टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बार्शी /प्रतिंनिधी – सासुरे येथील नागझरी नदी पात्रातील अनधिकृत वाळू चोरीचा पंचनामा करून तस्करावर कारवाई करण्यात यावी.तसेच वाळू चोरीस विरोध केल्यामुळे अंगावर टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बालाजी आवारे यांनी तहसिलदार बार्शी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की आज रोजी दि. २९/१०/२०२१ वेळ रात्री १.३० वाजता…

Read More