Headlines

Adipurush Public Review पाहून तुम्हीच ठरवा, आदिपुरुष पाहायचा की नाही?

[ad_1]

Adipurush Public Review:  ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush Movie Review) या चित्रपटाला घेऊन सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. या चर्चा चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून होत्या. त्यावरून अनेक कॉन्ट्रोव्हर्सी झाल्या. हा ट्रेलर नंतर सगळ्या सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आल्या आणि त्यानंतर प्रेक्षकांनी सजेस्ट केलेल्या सगळ्या गोष्टीं यातून काही गोष्टी काढून टाकण्यात आल्या आणि काही गोष्टी या अॅड करण्यात आल्या…

या सगळ्यानंतर जेव्हा चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला तेव्हा त्यावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला. असे असले तरी देखील चित्रपटाच्या तिकिटांच्या आगाऊ बूकिंग मिळत नव्हत्या. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतिक्षा करत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आज 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. त्यातील VFX आणि पटकथा कशी दाखवली आहे? असे अनेक प्रश्न जर तुम्हाला असतील तर हा रिव्ह्यू नक्कीच वाचा…

सोशल मीडियावर प्रेक्षक या चित्रपटाविषयी काय म्हणत आहेत हे जाणून घेऊया… कारण या प्रतिक्रियांवरून तुम्ही ठरवू शकतात की तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी तयार आहात की नाही. सोशल मीडियावर प्रभासच्या एन्ट्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्याच्या या एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर करत जय श्री राम असे कॅप्शन दिले आहे. तर काही थिएटरमध्ये प्रभासच्या एन्ट्रीवर अनेकांनी जय श्री राम अशा घोषणा दिल्या आहेत.

प्रभासनं बाहुबलीनंतर एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट दिले आणि आता त्याचा हा चित्रपट पाहून सगळ्यांना अपेक्षा आहे की प्रभास एक दमदार कमबॅक करणार आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटातील अॅक्शन सीन्स पाहून अंगावर शहारे आले तर काहींनी चित्रपट पाहताना शहारे येण्याचं कारण हे त्याचं म्यूजिक आहे. चित्रपटाचा फर्स्ट हाफ चांगला आहे आणि सेकेन्ड हाफ इतका चांगला नाही असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

ट्विटरवर अनेकांनी थिएटरमधील काही क्लिप्स शेअर करत प्रभासचा हा लूक पाहून त्यांना  बाहुबलीतील प्रभास आठवला आहे. बाहुबलीमध्ये प्रभासनं वडील आणि मुलाची भूमिका साकारली होती. त्याप्रमाणेच त्यानं आदिपुरुषमध्ये प्रभू श्री राम आणि त्यांचे वडील दशरथ यांची भूमिका साकारली होती. चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी VFX चांगले नाही असे म्हटले होते. तर आता चित्रपट पाहिल्यानंतर 600 कोटी खरंच VFX मध्ये खर्च केले का असा सवाल अनेकांनी केला आहे. या व्यतिरिक्त अनेकांनी आपल्या पुरानांमध्ये आणि जुन्या मालिकांमध्ये दाखवण्यात आलेल्या रावणाचा फोटो आणि सैफ अली खानचा चित्रपटातील लूकचे फोटो शेअर करत पुराणातील रावण खरां असून सैफनं साकरलेला हा कोणता रावण आहे असं म्हटलं आहे. दुसरीकडे काही लोकांना सैफला आपल्या जगातील म्हणजेच मॉर्डन रावण आणि मॉर्डन रामायण असे म्हटलं आहे.

दरम्यान, एका नेटकऱ्याला रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका आठवली. ते सांगत हा नेटकरी म्हणाला, मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहत आहे आणि ज्याप्रकारे या आदिपुरुषचे व्हिज्युअल्स दिसत आहेत. त्यापेक्षा 200 पटीने चांगले रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील आहेत. ही मालिका आजही सगळे आनंदानं पाहू शकतात तेही न कंटाळता. या मालिकेशी आदिपुरुषची कोणतीही तुलना करता येणार नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *