Headlines

मोठी बातमी! ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ मिळाल्यानंतर शिंदे गट उत्तर देण्याच्या तयारीत, आयोगाला ई-मेल, सुचवले तीन पर्याय | Eknath Shinde Faction Election Commission Party Symbol Sun Shivsena Uddhav Thackeray sgy 87

[ad_1]

राज्यातील सत्तासंघर्षामध्ये निवडणुकीच्या आयोगाच्या निर्णयामुळे अजून भर पडत आहे. सोमवारी निवडणूक आयोगाने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचं वाटप केल आहे. त्याआधी आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटाला धक्का देत शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठवलं. दरम्यान उद्धव ठाकरे गटाला नाव आणि पक्षचिन्ह मिळालं असलं तरी, शिंदे गटाला मात्र अद्याप पक्षचिन्ह मिळालेलं नाही. यासंबंधी आज आयोगाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, कोर्टाबाहेरुन म्हणाले “भविष्यात…”

शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर पक्षचिन्हासाठी तीन पर्याय ठेवले आहेत. यामध्ये तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड यांचा समावेश आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल केला असून, यामध्ये या तीन चिन्हांचा उल्लेख आहे. शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ चिन्हाला प्राधान्य असून, त्यासाठी आग्रह धरला जाणार आहे. दरम्यान निवडणूक आयोग सर्व शक्यता तपासून दुपारपर्यंत यासंबंधी निर्णय देण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाला मशाल ! ; आयोगाकडून ‘शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावास मान्यता

शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ या चिन्हांचा पर्याय दिला होता. मात्र, निवडणूक आयोगाने हे पर्याय फेटाळून मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत चिन्हांचे नवे तीन पर्याय देण्याचा आदेश शिंदे गटाला दिला होता.

दिल्ली उच्च न्यायालयात धाव

धन्युष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंना ‘धगधगती मशाल’

उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळालं असून, ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावासाठी मान्यता देण्यात आली आहे.

ठाकरे गटाच्या पक्षाच्या नावाासठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ असे तीन पर्याय आयोगापुढे सादर करण्यात आले होते. मात्र, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हा पक्षनावाचा पर्याय शिंदे गटानेही दिला होता. दोन्ही गटांकडून एकाच नावाचा आग्रह धरला गेल्याने हे पक्षनाव कोणत्याही गटाला न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आणि ठाकरे गटाच्या दुसऱ्या पर्यायाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठाकरे गट आता ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ या नावाने ओळखला जाईल.

ठाकरे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘धगधगती मशाल’ हे चिन्हांचे तीन पर्याय दिले होते. मात्र, हे तीनही पर्याय खुल्या यादीतील नव्हते. ‘त्रिशूळ’ या चिन्हाला धार्मिक संदर्भ असून, शिंदे गटानेही याच चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे हे चिन्ह दोन्हीही गटांना नाकारण्यात आले. ‘उगवता सूर्य’ हे ‘द्रमूक’ पक्षाचे चिन्ह असल्याने आणि या चिन्हावरही शिंदे गटाने हक्क सांगितल्याने हे चिन्हही रद्द झाले. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह खुल्या यादीतील नसले तरी, आता ते खुले करण्यात आले आहे. हे चिन्ह २००४ मध्ये ‘समता पक्षा’ला देण्यात आले होते.

उज्ज्वल निकम काय म्हणाले आहेत?

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी आतापर्यंतच्या घडामोडीवर भाष्य केलं असून, म्हणालेत की “प्रत्येक राजकीय प्रश्नाला तीन निवडणूक चिन्हं निवडण्याची मुभा असेल. त्यातील एक चिन्ह निवडणूक आयोग निवडतं. शिंदे गटाने दिलेले तीन पर्याय निवडणूक आयोगाच्या सूचीत नसल्याने पुन्हा एक संधी देण्यात आली असून, सूचीमध्ये असणारी तीन चिन्हं निवडण्यास सांगण्यात आलं आहे. शिंदे गटाने पर्याय दिले असून आयोग त्यातील एकास मान्यता देईल”.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *