Headlines

कोल्हापूर: व्यापाऱ्यास लुटणाऱ्या बोगस प्राप्तीकर अधिकाऱ्यांना अटक

[ad_1]

कोल्हापुरात प्राप्तीकर अधिकारी असल्याचा बहाणा करून व्यापाऱ्याकडील ८० लाख रुपये लूट केल्याप्रकरणी गुरुवारी पोलिसांनी सात संशयितांना अटक केली. सुकुमार हंबीरराव चव्हाण, राहुल बाबुराव मोरबाळे, राहुल अशोक कांबळे, जगतमान बहादुर सावंत, पोपट सर्जेराव चव्हाण, लमकी कैलाली बोनिया, नेपाळ व रमेश करण सोनार अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अन्य काही आरोपी फरारी आहेत.

हेही वाचा- माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बार्शीतील निवासस्थानासमोर स्फोटके फेकली; पाच जणांवर गुन्हा दाखल

या लुटीचा मुख्य सूत्रधार संजय शिंदे आहे. त्याचा सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील व्यापारी धनाजी आनंदा मगर याच्याशी पूर्वी वाद झाला होता. मगर यास धडा शिकवण्याचे त्याने ठरवले होते. त्याच्याकडील काही कर्मचाऱ्यांना फूस लावून कटात सामील करून घेतले होते. मगर हे १९ ऑक्टोंबर रोजी गांधीनगर येथील व्यापाऱ्याकडे पैसे घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी अडवून प्राप्तिकर अधिकारी असल्याचे सांगून पैशाची रक्कम हिसकावून नेली होती.

हेही वाचा- “कुणीतरी माझी काळजी करणारं आहे हे ऐकून…”, संजय शिरसाट यांचा सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ विधानावरून टोला!

याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ८० लाख रुपये लूट झाल्याचा गुन्हा नोंद झाला होता. तथापि हा आकडा फुगवून सांगण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने संशयित आरोपींकडून १७ लाख ६० हजार रुपये, तीन दुचाकी, मोबाईल साहित्य जप्त केले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *