Headlines

भिडे गुरुजींशी तुमचे वैयक्तिक संबंध आहेत का? पत्रकारांनी विचारताच जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले “मी त्यांना…” | jayant patil condem statment of sambhaji bhide said no personal relation with him

[ad_1]

‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी नुकतेच एका महिला पत्रकाराशी बोलताना आक्षेपार्ह विधान केले आहे. महिला पत्रकार प्रश्न विचारण्यासाठी आल्यानंतर ‘अगोदर कुंकू लाग, मगच तुझ्याशी बोलतो,’ असे संभाजी भिडे म्हणाले आहेत. भिडे यांच्या विधानावर आता राज्याभरातून आक्षेप व्यक्त करण्यात येत आहे. भिडे यांचे विधान म्हणजे महिलांचा अपमान आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भिडे यांच्या कोणत्याही वक्तव्याचे मी समर्थन करत नाही. तसेच त्यांचे आणि माझ्यात कोणतेही वैयक्तिक संबंध नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा >> ‘सरकारनं गुजरातची चाकरी करायचं ठरवलंय’ म्हणणाऱ्या जयंत पाटलांना फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले “तुम्ही…”

“माझे मनोहर भिडे (संभाजी भिडे) यांच्याशी कोणतेही वैयक्तिक संबंध नाहीत. मी त्यांना कधीही भेटायला जात नाही. यापूर्वी त्यांची भेट घेतलेली नाही. ते माझ्या आईच्या मृत्यूनंतर रक्षाविसर्जनाला आले होते. तेवढाच एक प्रसंग आहे. माझ्या आईच्या रक्षाविसर्जनाला हजारो लोक आलेले होते. त्यामुळे सतत अर्थ जळवू नये,” असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >> Video : रॅलीवरील गोळीबारानंतर इम्रान खान जखमी, हल्लेखोरास अटक; पाहा हल्ल्यानंतरचे दृश्य

“मनोहर भिडे यांच्या कोणत्याही विधानाचे मी समर्थन केलेले नाही. त्यांनी काल जे विधान केले ते महिला वर्गाचा अपमान करणारे आहे. महिलांचा अवमान करणे तसेच त्याला भारतमातेची पुष्टी जोडणे हे अतिशय अनाकलनीय आहे. महाराष्ट्रातील सर्व महिला त्यांचा निषेध करतील. अशी प्रवृत्ती सत्तारुढ पक्ष जोपासत आहे, याची महाराष्ट्रातील महिलांनी नोंद घेणे आवश्यक आहे,” असेही जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा >> शिंदे-फडणवीसांनी मध्यस्थी करूनही राणांकडून ‘घरात घुसून मारू’ असं वक्तव्य का? बच्चू कडू स्पष्टच म्हणाले…

संभाजी भिडे काय म्हणाले होते?

संभाजी भिडे २ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, एका महिला पत्रकाराने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता, “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही”, असे वादग्रस्त विधान केले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *