Headlines

गौरी खानने मुलाखत नाकारली, सुहानालाही बोलू न देता हात पक़डून नेलं? VIDEO व्हायरल, अनुषा दांडेकरने दिलं स्पष्टीकरण

[ad_1]

Anusha Dandekar on Gauri Khan: निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचा (Nita Mukesh Ambani Cultural Centre) उद्घाटन सोहळा संपला असला तरी त्याची चर्चा मात्र अद्यापही कायम आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत. यातीलच एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमध्ये अनुषा दांडेकरसह शाहरुख खानची (Shahrukh Khan) पत्नी गौरी खान (Gauri Khan) आणि मुलगी सुहाना खान (Suhana Khan) दिसत आहे. 

व्हिडीओत नेमकं काय?

व्हिडीओत अनुषा गौरी खानला एक बाइट देण्यासाठी विचारणा करत असल्याचं दिसत आहे. मात्र गौरी खान यावेळी तिला मुलाखत देण्यास नकार देते आणि पुढे जाते. दरम्यान यावेळी अनुषा सुहानाला घेऊन जात असताना गौरी खान तिला रोखते आणि तिचीही मुलाखत घेण्यापासून रोखते. अनुषा यावेळी फार प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान गौरी खानने नकार दिल्यानंतर सुहानाही तिच्याकडे पाहत राहते. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहीजणांनी अनुषाला ट्रोल केलं आहे. गौरी आणि सुहानाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हटलं जात आहे. तर काहींनी तिला गौरी आणि सुहानावर मुलाखतीसाठी जबरदस्ती केल्याने टीका केली आहे. अनुष्काचा चांगलाच अपमान झाल्याची कमेंट काहींनी केली आहे. तर एकाने अनुषा प्रसिद्धीसाठी शाहरुखच्या कुटुंबाचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. 

सोशल मीडियावर टीका होऊ लागल्यानंतर अनुषाने Instagram च्या माध्यमातून टीकाकारांना उत्तर दिलं आहे. “तुम्ही द्वेष करणारे असल्याने सतत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, या कार्यक्रमात उपस्थित नव्हते अशांचेही तुम्ही चाहते आहात यामुळे तुम्ही काहीही करुन मी वाईट दिसावी यासाठी प्रयत्न करत आहात. पण माफ करा, मी तुमच्या या योजनेचा भाग होऊ शकत नाही,” असं अनुषाने म्हटलं आहे.

काही लोकांना मुलाखती देण्यास आवडत नाही आणि त्यांनी कधीच दिलेली नाही. हे ठीक आहे असंही तिने म्हटलं आहे.  मला वाटतं मी चांगलं काम केलं आहे. या कामात मी चांगली आहे. पण जर तुमची इतकी मतं असतील तर माझी भूमिका निभावण्यापासून तुम्हाला कोणी रोखत नाही. तुम्हाला आनंद मिळो, जेणेकरुन हे असले प्रकार थांबवाल असंही तिने सांगितलं आहे. 

दरम्यान गौरी आणि सुहानाने मुलाखत दिली नसली तरी शाहरुखने मात्र तिच्याशी सविस्तर चर्चा केली. शाहरुखने मुलाखतीत सांगितलं की, “निता अंबानी यांनी यासाठी अनेक वर्षं मेहनत घेतली आहे. मला याबद्दल माहिती होतं. 10 ते 12 वर्षांपूर्वी आम्ही याविषयी चर्चा केली होती. त्यांनी मला ब्ल्यू प्रिंट दाखवली होती. ते खूप मोठ्या पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने डिझाइन केली गेली होती. आता ती खूप वेगळ्या पद्धतीने तयार केली गेली आहे. आणि इथे एक जिद्दीची भावना आहे. हा असा जिद्दीचा प्रवास आहे”.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *