Headlines

congress sachin sawant on rutuja latke resignation high court verdict case

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा चर्चेत आला होता. उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पालिका कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामाच पालिकेकडून स्वीकारण्यात आला नसल्यामुळे पेच निर्माण झाला होता. मात्र, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ऋतुजा लटकेंचा राजीनामा तातडीने स्वीकारण्यात यावा, असे निर्देश न्यायालयाने मुंबई महानगर पालिकेला दिले. यामुळे ऋतुजा लटके यांच्यासोबतच उद्धव ठाकरे गटालाही मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून भाजपावर खोचक शब्दांत टीकास्र सोडण्यात आलं आहे.

काय म्हटलं न्यायालयानं?

याप्रकरणी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यानंतर न्यायालयानं लटके यांना दिलासा देत निवडणूक लढण्याचा त्यांचा मार्ग मोकळा केला. पालिका कर्मचारी असताना कायद्याने लटकेंना निवडणूक लढवता येणार नव्हती. म्हणूनच भाजपाकडून ही खेळी खेळली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होता. “एका सामान्य कर्मचाऱ्याच्या राजीनाम्याला एवढे महत्त्व का दिले जात आहे. उलट एका कर्मचाऱ्याला निवडणूक लढवायची आहे, तर तुम्ही त्याचा राजीनामा स्वीकारायला हवा. हे प्रकरण इथपर्यंत यायलाच नको होता,” असं म्हणत न्यायालयानं पालिकेला आज सुनावलं.

यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला लक्ष्य करत खोचक शब्दांत टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर केलेल्या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी बिरबलाच्या एका विधानाचाही उल्लेख केला आहे.

बूंद से गई, वो हौद से…

आपल्या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी बिरबलाने अकबराला सांगितलेल्या एका गोष्टीचा उल्लेख केला आहे. ‘(इज्जत) बूंद से गयी वो हौद से नहीं आती, असे बिरबल अकबराला म्हणाला होता. इथे तर भाजपा ची हौदा हौदाने चालली आहे’, असा टोला सचिन सावंत यांनी ट्वीटमधून लगावला आहे.

“एवढा क्रूर प्रकार करायलाच हवा का? एका व्यक्तीसाठी..”, आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

दरम्यान, आपल्या ट्वीटमधून सावंत यांनी भाजपाला खोचक सल्लाही दिला आहे. ‘सल्ला – शांतपणे ऋतुजा लटके यांना पाठिंबा देऊन निवडणूक बिनविरोध करा. वक्त रहते संभल जाओ, वरना वक्त तुम्हे संभाल ही लेगा.. बस वक्त का मंजर दर्दनाक होगा’, असं ट्वीटमध्ये सावंत यांनी म्हटलं आहे.

sachin sawant tweet
सचिन सावंत यांचं ट्वीट!

ऋतुजा लटके यांना न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे आता विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *