Headlines

shivsena uddhav balasaheb thackeray party candidate say rutuja latke after high court bmc relief andheri by poll election ssa 97

[ad_1]

मुंबईतील अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पालिकेला आपला राजीनामा स्वीकारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी लटके यांनी केली. त्यावर आज ( १३ ऑक्टोंबर ) सुनावणी पार पडली.

यावेळी उच्च न्यायालयाने राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना उद्या ( १४ ऑक्टोंबर ) सकाळी ११ वाजेपर्यंत द्या, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाचे लटकेंनी स्वागत केलं आहे.

हेही वाचा – “पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव देण्यात भुजबळांचे योगदान”; शरद पवारांचे अमृत महोत्सवानिमित्त गौरवोद्गार

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ऋतूजा लटके म्हणाल्या की, “माझा न्यायदेवतेवर विश्वास होता. पतीचा वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे. मी शुक्रवारी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करेन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडूनच मी निवडणूक लढणार आहे. नवीन चिन्ह असली तरी लोक जुनीच आहेत. माझ्यासोबत पती रमेश लटके यांचं नाव आहे, त्यांची पुण्याई होती, म्हणून न्यायालयाचा निर्णय झाला,” असेही ऋतूजा लटके यांनी म्हटलं.

हेही वाचा – “उद्धव ठाकरे हताश, अकर्तृत्ववान, अहंकारी”, भाजपा आमदाराचा टोला; म्हणाले, “घरात बसणाऱ्यांना…”

न्यायालय काय म्हणाले?

“एका सामान्य कर्मचाऱ्याच्या राजीनाम्याला एवढे महत्त्व का दिले जात आहे. उलट एका कर्मचाऱ्याला निवडणूक लढवायची आहे, तर तुम्ही त्याचा राजीनामा स्वीकारायला हवा. हे प्रकरण इथपर्यंत यायलाच नको होता,” असे न्यायालयाने ऋतुजा लटकेंच्या याचिकेवरून पालिका अधिकाऱ्यांना खडसावले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *