Headlines

चालत्या मेट्रोत बॉबी डार्लिंगचा धिंगाणा; Video Viral

[ad_1]

Bobby Darling Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री आणि रिअॅलिटी शोमध्ये दिसलेली बॉबी डार्लिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत अभिनएत्री दिल्ली मेट्रोमध्ये एका व्यक्तीसोबत भांडताना दिसत आहे. इतकंच नाही तर दोघांमध्ये हानामारी देखील झाली. त्यादोघांनी एकमेकांना शिवीगाळ केला. व्हायरल व्हिडीओत एका पुरुष प्रवासीसोबत तिनं गैरव्यवहार केल्याचे पाहायला मिळत आहे. त्या भांडणात एका एका पोलिस कर्मचाऱ्याला सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागल्या. त्यांनी कशी तरी दोघांची भांडणं थांबवली. 

बॉबी डार्लिंगचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय या व्हिडीओत आपण पाहु शकतो की बॉबी डार्लिंगच्या हातात एक पांढऱ्या रंगाची बॅग आहे. ज्यात सामान असण्याची शक्यता आहे. त्या बॅगला खेचण्याचा प्रयत्न तो पुरुष प्रवासी करत आहे. तर त्यांच्या या भांडणात सीआयएसएफ कर्मचारी मध्यस्ती करतो आणि हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे अभिनेत्री शिवीगाळ करताना दिसत आहे.

नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं की रिलॅक्स गाईज. दिल्ली मेट्रो आहे, सगळं चालतं. या व्हिडीओला 84 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. तर फक्त लोकांनी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटले की ‘हे काय होतंय.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मी दिल्ली मेट्रोत हा व्हिडीओ पाहतोय.’ 

हेही वाचा : नशेत धडपडतोय आमिर खान? VIRAL व्हिडीओमुळे एकच चर्चा

नेटकऱ्यांनी घेतली बॉबी डार्लिंगची बाजू

बॉबी डार्लिंगच्या या व्हिडीओवर कमेंट करतकाही नेटकऱ्यांनी तिची बाजू घेतली आहे. एक नेटकरी म्हणाला की ‘ती एक तृतीयपंथी आहे. त्यामुळे तुम्ही कोण आहात तिचं लिंग ठरवणारे की तो भांडतोय कि ती भांडत. सगळ्याआधी तिला एक मुलीसारखा सन्मान द्या. जर तुम्ही कोणत्या तृतीयपंथीला मुलासारखं बोलालं तर असं वाटेल की तुम्ही तिला शिवीगाळ करत आहात.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काय आहे हे…. कुठे गेली मानवता?’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *