Headlines

ओंकार भोजने पुन्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सोबत? ‘तो’ फोटो चर्चेत

[ad_1]

Omkar Bhojane Update : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेता ओंकार भोजने घराघरात पोहोचलाय. पण काही दिवसांपूर्वी ओंकार भोजनेने या कार्यक्रमातून प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. यानंतर ओंकार भोजने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला दिसला. नाटक ‘करून गेलो गाव’ आणि झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात. असं असतानाही प्रेक्षक ओंकार पुन्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात येणार का? अशी वाट पाहत होते. या दरम्यानच ओंकारचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 

(फोटो सौजन्य – Omkar Bhojane / Vanita Kharat Instagram )

‘तो’ फोटो व्हायरल 

नुकताच अभिनेत्री नम्रता संभेरावरने इन्स्टाग्रामवर ओंकार भोजने आणि वनिता खरातसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या तिघांच्या फोटोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचा एकत्र फोटो पाहून चाहते भोजने पुन्हा या टिमसोबत दिसणार का? अशी शक्यता वर्तवत आहेत. या फोटोमागचं सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. 

फोटो नेमका कुठचा 

‘एकदा येऊन तर बघा’ या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने सगळ्या कलाकारांनी नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी नम्रता संभेरावने वनिता खरात आणि ओंकार भोजनेबरोबर खास फोटोसेशन केलं. या कार्यक्रमामधील हा फोटो आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात हे तिन्ही कलाकार महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

याआधीही घेतली होती कलाकारांची भेट 

ओंकार भोजनेने ‘हास्यजत्रा’ कार्यक्रम सोडला तरीही या कार्यक्रमातील सगळे विनोदवीर आजही त्याच्या संपर्कात असतात. वनिता खरातच्या लग्नाला ओंकार जाऊ शकला नाही मात्र नंतर त्याने वनिताच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तसेच याआधी ओंकार भोजनेने प्रसाद खांडेकरसोबतचाही फोटो शेअर केला होता. 

ओंकार भोजने आणि महाराष्ट्राची हास्यजत्रेमधील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळे हे कलाकार खासगी आयुष्यात काय करतात, याबाबत प्रेक्षकांना जाणून घेण्यात उत्सुकता असते. 

सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला 

‘एकदा येऊन तर बघा’ हा सिनेमा येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांची फौज आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, भाऊ कदम, ओंकार भोजने, वनिता खरात, रोहित माने या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *