Headlines

वडिलांसोबत अक्षय खन्नाला कामच करायचं नव्हतं; 15 वर्षांपूर्वीच सांगितले कारण

[ad_1]

Akshaye Khanna : बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्नाला देखील त्यांच्या प्रमाणे व्हायचे होते. त्यानं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं काम केलं. पण त्याला कधीच त्याच्या वडिलांसोबत काम करायचं नव्हतं. वडिलांसोबत स्क्रिन शेअर करण्याच्या तो नेहमीच विरोध करायचा. याचा खुलासा स्वत: अक्षयनं एका मुलाखतीत केला आहे. त्यासोबत त्यानं याचं कारण देखील सांगितलं आहे. 

वडिलांसोबत स्क्रिन शेअर करायची इच्छा नाही

अक्षयनं ही मुलाखत 2008 मध्ये IANS ला दिली होती. या मुलाखतीत अक्षयनं सांगितलं होतं की त्याचे वडील विनोद खन्ना अशा कलाकारांपैकी एक आहे ज्यांच्यासोबत त्याला कामा करायची इच्छा नाही. यावेळी त्यानं हे देखील सांगितलं होतं की त्याला मोठ्या पडद्यावर अशा व्यक्तीसोबत काम करायचं नाही जो स्क्रिनवर त्याच्यापेक्षा जास्त पावरफूल आहे. 

वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम करताना आला भयानक अनुभव

अक्षय खन्ना यावेळी म्हणाला की ‘जेव्हा त्यानं वडील विनोद खन्ना यांच्यासोबत पहिला चित्रपट ‘हिमालय पुत्र’ मध्ये काम केलं होतं. तर तो एक खूप भयानक अनुभव होता. अक्षयनं सांगितलं की ‘काही लोक आहे ज्यांच्यासोबत तुम्ही काम करायला नको. माझे वडील त्यांच्यापैकी एक आहेत. अमिताभ बच्चन त्या यादीत दुसरे आहेत. आत्मविश्वासानं त्यांच्यासोबत काम करण्यासाठी एका फ्रेममध्ये उभं राहणं अशक्य आहे. त्यांची स्क्रिनवर असणारी उपस्थिती खूप मोठी आहे. आपल्या वडिलांसारखं स्क्रिनवर काम करणं खूप कठीण आहे. हे वैशिष्ठ्य माझ्यात नाही. स्क्रिनवर माझा असला प्रेझेंस नाही. काही कलाकार आहेत, जे स्क्रिनवर आपल्यासोबत असतील तर ते आपल्याला झाकून देतात. माझे वडील त्यांच्यापैकी एक आहेत.’ 

हेही वाचा : चालत्या मेट्रोत बॉबी डार्लिंगचा धिंगाणा; Video Viral

वडिलांच्या बायोपिकमध्ये अक्षय खन्ना करणार काम? 

2017 मध्ये अक्षय खन्नाला प्रश्न विचारला की होता की ‘तो त्याचे वडील विनोद खन्ना यांच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारणार का? त्यावर उत्तर देत अक्षय म्हणाला होता की ‘हा पर्याय नाही कारण तो त्याच्या वडिलांसारखा दिसत नाही.’ इतकंच नाही तर त्यानं पुढे सांगितलं की ‘त्यानं कधी बायोपिक बनवण्याविषयी विचार देखील केला नाही. कारण ही गोष्ट कोणत्याही कलाकारासाठी खूप मोठी आणि धोकादायक गोष्ठ आहे.’ 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *