Headlines

bjp atul bhatkhalkar mocks ajit pawar on home minister post statement

[ad_1]

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या चर्चेवर आता जवळपास पडदा पडला आहे. ५ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असल्याचं शुक्रवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर स्पष्ट झालं आहे. मात्र, त्याचवेळी अजित पवारांनी पुण्यात झालेल्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना केलेलं एक विधान जोरदार चर्चेत आलं आहे. अजित पवारांनी मिश्किलपणे हे विधान केलं असलं, तरी त्यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात भाजपानं खोचक शब्दांत टीका करताना अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार हे त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. काल पुण्यात झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत गृहमंत्रीपदाविषयी बोलताना अजित पवारांनी अशाच प्रकारे विनोदी टिप्पणी केली. अजित पवार म्हणाले, “राज्यात सरकार आल्यानंतर मला उपमुख्यमंत्री केलं. मी वरिष्ठांना म्हटलं की मला गृहखातं द्या. पण तेव्हा ते अनिल देशमुखांना दिलं गेलं. नंतर पुन्हा मी गृहखातं मागितलं. तर तेव्हा ते दिलीप वळसे पाटलांना दिलं. कदाचित वरिष्ठांनाही वाटलं असेल की याला गृहमंत्री केलं तर हा आपलंही ऐकणार नाही”. अजित पवारांनी असं वक्तव्य करताच सभागृहात चांगलाच हशा पिकला.

“मला जे योग्य वाटत, तेच मी करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता जरी चुकला तरी त्याला माफी नाही. माझ्याकडे सर्वांसाठी सारखा नियम आहे. एखादा कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा असेल. मात्र, तोच जर चुकत असेल तर त्याला पाठिशी घालण्यात अर्थ नाही”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

“मला गृहमंत्री व्हायचं होतं. मात्र, वरिष्ठांनी…”; पुण्यातील मेळाव्यात अजित पवारांनी व्यक्त केली खंत

भाजपाचा टोला!

दरम्यान, अजित पवारांच्या या विधानावरून भाजपानं खोचक शब्दांत टोला लगावला आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात खोचक ट्वीट करत अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. “दादा… तुमच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. पण हे म्हणजे मढ्यामागून रडं असा प्रकार झाला”, असं भातखळकर यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

atul
अतुल भातखळकरांचं ट्वीट!

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना दिलीप वळसे पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. “त्यावेळी वरिष्ठांनी तो निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला हे मला सांगता येणार नाही आणि त्यावर मी काही बोलू इच्छित नाही”, असं वळसे पाटील म्हणाले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *