Headlines

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक Video | Video Pakistan Zindabad Slogan allegedly raised in Pune scsg 91

[ad_1]

पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईविरधात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ही घोषणाबाजी करण्यात आली.

पीएफआयविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं नियोजन या आंदोलकांनी केलं होतं. मात्र हे आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात गेतलं. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आलं. यावेळी अनेकांना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलं.

यानंतर आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणा दिल्या. या घोषणाबाजीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळेस आंदोलकांनी ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली.

या घोषणाबाजी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि ६० ते ७० पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झाल्याचा उल्लेख यामध्ये पोलिसांनी केला आहे.

या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी अन्य काही व्यक्तींनाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *