Headlines

Aryan Khan चा बहिणीप्रती आदर व्यक्त करण्याचा अंदाज पाहता सोशल मीडियावर होतंय कौतुक

[ad_1]

Aryan Khan at Nita Mukesh Ambani Cultural Centre : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (Nita Mukesh Ambani Cultural Centre) काल तिसरा दिवस होता. (NMACC) यावेळी बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अशात सेलिब्रिटींसोबतच त्यांची मुलं म्हणजेच स्टार किड्सनं देखील हजेरी लावली होती. दरम्यान, यावेळी सगळ्यांचे लक्ष हे बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खाननं (Aryan Khan) वेधलं आहे. आर्यननं असं काही केलं की त्याला नेटकरी Gentleman असं म्हणतं आहेत. त्याच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Aryan Khan Viral Video)

आर्यन आणि सुहाना (Suhana Khan) हे त्यांची आई गौरीसोबत (Gauri Khan) नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये दोन्ही दिवस दिसले होते. दुसऱ्या दिवशी तर त्यांच्यासोबत शाहरुख खानही दिसला. त्यांचे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात त्यांचे फॅन पेज आणि अनेक सेलिब्रिटी फोटोग्राफर्सचे आहेत. दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आर्यन, सुहाना आणि गौरी यांनी जेव्हा पिंक कार्पेटवरून एन्ट्री केली, तेव्हा ते पापाराझींसमोर पोझ देण्यासाठी उभे राहिले होते. त्यावेळी बहिण सुहानासोबत पोज देत असताना आर्यननं तिच्या कंबरेवर हाथ न ठेवता. फक्त फोटोत दाखवण्यासाठी तिच्या मागे हात नेला होता. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याची स्तुती केली आहे. त्याला जेन्टलमेन असं म्हटलं आहे. (Aryan Khan and Suhana Khan) 

पाहा आर्यनचा व्हिडीओ – 

आर्यनच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, मुस्लिमांमध्ये आपली बहीण असो किंवा मग इतर कोणती स्त्री तिला हात लावत नाहीत किंवा पकडत नाही. हे फक्त नॉन मुस्लिम लोकांमध्ये कॉमन आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, तो शाहरुखचा मुलगा आहे हे त्यानं सिद्ध करून दाखवलं आहे. ते भाऊ-बहीण आहेत हे मान्य आहे. पण तिनं बॅकलेस ब्लाऊज परिधान केलं आहे. अशात तो तिला कसं स्पर्श करणार यालाच शिष्ठाचार म्हणतात. (Aryan Khan at Nita Mukesh Ambani Cultural Centre)

हेही वाचा : नव्या गाण्यावर Prajakta Mali चा ‘मनसे’ डान्स, VIDEO VIRAL

दरम्यान, काही नेटकऱ्यांनी यातही आर्यनला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, ती त्याची बहीण आहे, त्यात काय शिष्ठाचार. दुसरा म्हणाला, आर्यन त्याच्या बहिणाला पकडू शकतो. ती कोणीही दुसरी स्त्री नाही बहीण आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, त्यानं त्याच्या बहिणीच्या कंबरेवर हाथ ठेवला असता तरी त्यात काही प्रॉबलम नाही, उगाच काही अर्थ लावू नका. आणखी एक नेटकरी म्हणाला, त्यानं हाथ ठेवला असता तरी तुम्ही त्याला ट्रोल केलं असतं.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *