Headlines

Indian Idol Season 13 Winner : “मला जन्म देणाऱ्या आईने सोडून….,” इंडियन आयडॉल 13 चा विजेता Rishi Singh झाला भावूक

[ad_1]

Indian Idol 13 Winner : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल 13 चा (Indian Idol 13 Winner) ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. या शो मध्ये ऋषी सिंहने (Rishi Singh ) विजेतेपद पटकावले आहे. ट्रॉफी जिंकण्यासाठी सोनाक्षी कार, शिवम सिंग, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती आणि देवोस्मिता रॉय हे अंतिम फेरीत होते. मात्र शोच्या सुरुवातीपासूनच ऋषी खूप लोकप्रिय झाला होता. ज्यामुळे सोशल मीडियावर लोक आधीच दावा करत होते की ऋषीचं इंडियन आयडॉल 13 चा विजेता असणार आहे. 

रविवारी झालेल्या महाअंतिम फेरीत देवोस्मिता रॉयने दुसरे तर चिरागने तिसरे स्थान पटकावले. अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात विजेत्याची निवड थेट मतदानाद्वारे केली जाणार होती. ज्यामध्ये ऋषीला सर्वाधिक मते मिळाली. ऋषीने ट्रॉफीसह 25 लाख रुपये आणि एक चमकणारी कार बक्षिस म्हणून देण्यात आली. 

‘इंडियन आयडॉल 13’ चा ग्रँड फिनाले

2 एप्रिल 2023 रोजी सोनी वाहिनीवर प्रसारित होणार्‍या ‘इंडियन आयडॉल 13’ या शोचा ग्रँड फिनाले होता. फिनाले रेसमध्ये 6 फायनलिस्ट होते ज्यात ऋषी सिंग, शिवम सिंग, बिदिप्ता चक्रवर्ती, चिराग कोतवाल, देबोस्मिता रॉय आणि सोनाक्षीकर यांचा समावेश होता. शोमध्ये अनेक धमाकेदार परफॉर्मन्स होते आणि अनेक सेलेब्सने त्यात सहभाग घेतला. ‘बेस्ट डान्सर 3’ चे जज सोनाली बेंद्रे, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस देखील शोमध्ये आले होते. शेवटी विजेता घोषित करण्यात आला, जो ऋषी सिंग होता.   

ऋषी हा दत्तक मुलगा… 

ऋषी सिंग हा मूळचा अयोध्याचा. त्याला नेहमी गाणी लिहिण्याची आणि गाण्याची आवड राहिली. ऋषी सिंहने शोमध्ये सांगितले होते की, तो त्याच्या आई-वडिलांचा खरा मुलगा नाही, तर त्याच्या आई-वडिलांनी त्याला दत्तक घेतले होते. ऋषी सिंग सध्या डेहराडूनमधील हिमगिरी जी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करत आहेत. तो ‘इंडियन आयडॉल 13’ चा विजेता बनला आहे यावर त्याचा विश्वास बसत नाही. जारी केलेल्या निवेदनात ऋषी सिंह म्हणाला, ‘माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. जेव्हा माझे नाव विजेते म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. या महत्त्वाच्या शोचा वारसा पुढे नेणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी चॅनल, जज आणि इंडियन आयडॉलच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे.

ऋषी सिंह मंदिरात गात होता…

‘इंडियन आयडॉल 13’ चा विजेता ठरलेला ऋषी सिंह हा अयोध्येचा रहिवासी आहे. सिंगिंग शोमध्ये येण्यापूर्वी  तो मंदिर आणि गुरुद्वारांमध्ये गात असायचा. विजेता झाल्यानंतर ऋषी यांनी एक निवेदन जारी केले की, “मला अजूनही विश्वास बसत नाही की मी ट्रॉफी जिंकली आहे. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे.” 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *