Headlines

”त्या’ गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही”, अंबादास दानवेंचं विधान, राज्यातील समस्यांवरुन सरकारला फटकारलं! Vidhanparishad opposition leader Ambadas Danve criticized shinde fadanvis government on various state issues

[ad_1]

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरुन सरकारवर टीकास्र डागलं आहे. सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा प्रश्न एका पत्रकाराने विचारताच दानवे यांनी या गुन्ह्यांना भीक घालत नसल्याचं म्हटलं आहे. “आम्ही विरोधी पक्ष आहोत. सरकारच्या चुकांवर बोट ठेवणं आमची जबाबदारी आहे. सरकारला यात गैर वाटत असेल आणि त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील, तर शिवसेना या गुन्ह्यांची चिंता करत नाही. असे गुन्हे आमच्यावर अनेकदा दाखल झाले आहेत”, असे दानवे यांनी म्हटले आहे.

“वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन आणि…”, आशिष शेलारांचं आदित्य ठाकरेंवर टीकास्र

मुंबईतील आझाद मैदानावर विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. “या शिक्षकांबाबतच्या धोरणाला सरकार तिलांजली देत आहे. १० ऑक्टोबरपासून शिक्षक आंदोलन करत आहेत, मात्र त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही. या संदर्भात सरकार खोटी आश्वासनं देत आहे”, असा आरोप दानवे यांनी केला आहे. या ठिकाणी अघोषित शिक्षकही आंदोलनाला बसले आहेत. शिक्षक म्हणून घोषित करावं, या त्यांच्या किमान मागणीकडेही सरकार दुर्लक्ष करत असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

एका रात्रीत ५० आमदार गुजरातहून गुवाहाटीला पोहचतात, मग शिधा पोहचायला उशीर का? भाजपाचे मंत्री म्हणाले…

पुराच्या पाण्यामुळे पाणी पुरवठा करणारे पंपच बंद आहेत, त्यामुळे आकाशातून पाणी टाकू का? असं विधान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्याचा समाचारही दानवे यांनी घेतला आहे. “मंत्र्यांनी जनतेच्या भावनांकडे संवेदनशीलतेनं बघितलं पाहिजे. मंत्र्यांनी अशा पद्धतीचं बोलणं जनतेच्या भावनेचा अपमान आहे”, असे दानवे म्हणाले आहेत.

“…तर आकाशातून पाणी टाकू का?” पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

राज्यातील शिधा वाटपाच्या पाकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. “या सणात नेत्यांनी राजकारण करू नये. एखादी मोठी योजना राबवून दिवे लावल्यास त्याबाबत फोटोच काय अन्य बऱ्याच गोष्टी केल्या तरी आमचा आक्षेप नाही. जनतेच्या पैशातून २०० रुपयांचा फराळ ठेकेदाराला ३०३ रुपये देऊन सरकार परत जनतेलाच देतंय. यावर प्रदर्शन करण्याची गरज नाही”, अशी टीका दानवे यांनी केली आहे. “राज्यातील पोलिसांच्या बदल्या करण्याची गरज आहे. पण हे सरकार या बदल्या सुद्धा करत नाहीए. या बदल्या लवकर झाल्या पाहिजे ही विरोधी पक्षांची भूमिका आहे”, असं दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *