Headlines

Covid 19: करोना अद्यापही संपलेला नाही, WHO चं मोठं विधान; महाराष्ट्र सरकारकडूनही नागरिकांना निर्देश, जाणून घ्या पाच मुद्दे | WHO Covid 19 is still a global health emergency Maharashtra sgy 87

[ad_1]

करोना अद्यापही जागतिक आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) स्पष्ट केलं आहे. तीन वर्षांपूर्वी सर्वात प्रथम जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला आणीबाणी घोषित केलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी करोनाचा अंत दृष्टीक्षेपात असल्याचं सांगितल्याच्या एका महिन्यानंतर ही माहिती समोर आली आहे. दरम्यान भारतात गुरुवारी करोनाचे २१४१ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबतच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या २५ हजार ५१० वर पोहोचली आहे.

पाच मुद्द्यांमधून जाणून घेऊयात सर्व माहिती

१) जागतिक आरोग्य संघटनेनेने बुधवारी करोना अद्यापही जागतिक आणीबाणी असल्याचं सांगितलं आहे. करोनासंबंधी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन आपत्कालीन समितीने बैठक घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. टेड्रोस गेब्रेयसस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, “या महामारीने आपल्याला याआधीही आश्चर्यचकित केलं असून, पुढेही करु शकतात” असं म्हटलं आहे.

सणासुदीच्या अगोदर राज्य सरकारकडून करोना संसर्गवाढीचा सूचक इशारा!

२) जागतिक आणीबाणी संपवण्यासाठी समितीने पाच प्राथमिक मुद्दे मांडले आहेत. यामध्ये करोनाचे व्हेरियंट शोधणं, रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढवणं, लसीकरण, परवडणारी उपचारपद्धती यांचा समावेश आहे. समितीने सांगितलं आहे की “जगातील काही भागांमध्ये करोना संपला अशी समजूत असली तरी, हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे जो लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतो”.

३) भारतामध्ये चाचणी करण्यात आली असताना करोनाच्या XBB उपप्रकाराचे ७० हून जास्त रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत.

विश्लेषण : अनेक महिन्यानंतरही १० पैकी ४ रुग्ण करोनामधून पूर्णपणे बरे झालेले नाहीत; दहा हजार जणांवर करण्यात आला अभ्यास

४) महाराष्ट्रात गेल्या आठवड्याच्या तुलनेत करोना रुग्णसंख्येत १७.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. आगामी सण लक्षात घेता राज्य सरकारनेही नागरिकांना करोनाच्या नव्या उपप्रकारापासून आपलं संरक्षण करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान भारतात गुरुवारी करोनाचे २१४१ नवे रुग्ण आढळले आहेत.

५) सणासुदीच्या काळात बंद जागेत व्यक्ती एकत्र आल्यास संक्रमणाची शक्यता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे शहाणपणाचे ठरेल. एखाद्याला गंभीर आजार असल्यास काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *