Headlines

अखेर ते ‘छपरी’ डायलॉग बदलले! ‘आदिपुरुष’मधील नवे changes पाहिले का?

[ad_1]

Adipurush : ओम राऊतच्या दिग्दर्शनात साकारल्या गेलेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. रामायणाच्या धर्तीवरील पटकथेची जोड असतानाही या चित्रपटाला अपेक्षित यश मात्र मिळताना दिसत नाहीये. त्यामगची कारणं अनेक आहेत. यातलंच एक कारण म्हणजे चित्रपटातील डायलॉग्स. पहिल्याच दिवशी ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांनी लगेचच त्यातल्या संवादांवरून दिग्दर्शक आणि संवाद लेखकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. 

”कपड़ा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, जलेगी भी तेरे बाप की….”, कोणी लिहिला हा डायलॉग? हे असे संतप्त प्रश्न विचारण्याऱ्यांची संख्या दिवसागणित वाढताना दिसली आणि हा वाढता विरोध पाहता अखेर चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी या विरोधापुढे शरणागती पत्करली. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तरी याचाच अंदाज येत आहे. जिथं चित्रपटातील हनुमानापासून ते अदी रावणापर्यंतचे संवाद बदलण्याच आल्याचं लक्षात येत आहे. प्रेक्षकांच्या भावना दुखावणारे संवाद बदलत आता नव्या संवादांसह हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे. जिथं हनुमान मेघनादाला म्हणताना दिसतोय, ‘कपड़ा तेरी लंका का, तेल तेरी लंका का, आग भी तेरी लंका की, जलेगी भी तेरी लंका ही.’ 

चित्रपटांच्या संवादांचं पुन्हा नव्यानं ध्वनीमुद्रण करण्यात आलं असून, आता ते या चित्रपटाची पडती बाजू सावरून नेणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण, एकिकडे निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्यांच्या परिनं हे प्रकरण सावरून नेण्याचा प्रयत्न केला असला तरीही लिप्सिंकमध्ये मात्र करण्यात आलेला हा बदल स्पष्टपणे कळतोय. बरं First impression is last impression या सिद्धांतानुसार म्हणावं तर, हा चित्रपट पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या मनातून उतरला आहे. त्यामुळं आता त्याला हे नवे बदलही तारतील की नाही ही शंकाच. 

चित्रपटाच्या कमाईचा आकडा घरंगळला… 

सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलं खरं. पण, तिसऱ्या दिवसापासून मात्र ‘आदिपुरुष’ तोंडघशी पडला. तिसऱ्या दिवशी चित्रपटानं 29.03 कोटी, चौथ्या दिवशी 16 कोटी आणि पाचव्या दिवशी 10.80 कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटानं 247.90 कोटींचा गल्ला जमवला असला तरीही तो अपेक्षेहून कमीच आहे हेही तितकंच खरं. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *