Headlines

भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर टोरंटोमध्ये

[ad_1]

मुंबई :  बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या आगामी थँक यू फॉर कमिंगसाठी भारताचं प्रतिनिधित्व टोरांटो फिल्म फेस्टीव्हलमध्ये यंदा करण्यासाठी सज्ज आहे. टोरांटो फिल्म फेस्टीव्हल  2023मध्ये  टोरांटो येथे 07 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान सुरू राहील. सिनेमॅटिक वैविध्य आणि सर्जनशीलता साजरे करणारे, जगभरातील सर्वोत्कृष्ट सिनेमा सादर करण्याचे जागतिक व्यासपीठ म्हणून या चित्रपट महोत्सवाने स्वतःसाठी एक स्थान निर्माण केलं आहे. यंदा बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या आगामी ताज्या कलाकृतीच्या रूपात प्रकाशझोतात येणार आहे. थँक्यू फॉर कमिंग’ने फेस्टिव्हलच्या प्रतिष्ठेत मानाचं स्थान पटकावले आहे.
 
भूमी पेडणेकर ही अष्टपैलू अभिनयासाठी ओळखली जाते. भूमी ज्या पद्धतीने सांस्कृतिक सीमारेषा पार करते आणि जगभरातील प्रेक्षकांशी तिने स्वत:ची नाळ जोडलेली आहे ती पाहून तिच्या क्षमतांचा थांग लागतो. ती मानवी भाव-भावना आणि अनुभवाचे मूर्तिमंत उदाहरण वाटते. तिने स्वत:ची लक्षवेधी कामगिरी आणि गोष्ट सांगण्याची हटके निष्ठा यामुळे भूमीचा निर्माते तसेच टोरांटो इंटर नॅशनल फिल्म फेस्टीव्हलमधील थँक यू फॉर कमिंगच्या सहकलाकारांसह व्यवहार हा महोत्सवाच्या वैविध्यपूर्ण आणि कलात्मक नाविन्याच्या वचनबद्धतेत आपले योगदान देणारा आहे.        
याविषयी बोलताना भूमी म्हणाली, ”माझी टीआयएफएफ’मधली ही पहिलीच वेळ आहे. माझ्या खूप जवळ असलेला सिनेमा घेऊन मी तिथे जातेय याचा मला आनंद वाटतो. थँक यू फॉर कमिंग!” या शब्दांत भूमी पेडणेकर व्यक्त झाली. ”प्रतिष्ठित रॉय थॉम्पसन हॉलमध्ये गाला प्रीमियरसाठी आमची निवड झाली आहे ही घटना अतिशय खास म्हटली पाहिजे. एक अधिकृत निवड म्हणून आणि आमच्याकडे रोखलेल्या नजरा, हा अनुभव घेण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. इतका मोठा आणि वैविध्यपूर्ण प्रेक्षक वर्गाची मागणी करणारा स्वत:चाच सिनेमा पाहण्याचा अनुभव मी यापूर्वी कधीच घेतला नाही. माझे सहकलाकार, दिग्दर्शक करण बुलानी आणि आमचे निर्माते अनिल कपूर आणि रिया कपूर यांच्यासोबत त्या रेड कार्पेटवर असणं अविस्मरणीय ठरेल. 
 
एक भारतीय कलाकार म्हणून मला अभिमान वाटतो. या प्रतिष्ठित सोहळ्यात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करताना मला अभिमान वाटतो. थँक यू फॉर कमिंग प्रेमाच्या शोधात असलेल्या तरुण मुलींच्या  भावनेचा उत्सव साजरा करते. त्यांना जीवनातून जे पाहिजे ते निवडण्याचं स्वातंत्र्य कसं पाहिजे यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. कॉमेडी हा एक प्रकार माझ्यासाठी कठीण आहे. टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल’ मध्ये जागतिक स्तरावर रिलीज होण्याआधी आमची चर्चा रंगत असल्याने मेहनतीचे फळ मिळू लागल्याची भावना मनात आहे. हा एक अतिशय प्रगतीशील चित्रपट आहे. भारतातील सिनेमा आजच्या काळातील महिलांना कशाप्रकारे साजरा करतो आणि चित्रित करतो हे जगाला दाखवण्याची संधी आम्हाला लाभली आहे.”
 
भूमी पेडणेकरचा प्रवास बॉलिवूडच्या आकर्षक सेटवरून टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल’च्या प्रसिद्ध मंचपर्यंत पोहोचत आहे. तिच्या कलात्मकतेला मिळालेली ही पोचपावती म्हणता येईल. भूमी ही एक अशी अभिनेत्री आहे, जी भारतीय सिनेमावर निव्वळ आपली छाप उमटवत नाही, तर जागतिक रंगमंचावरही स्वत:चा  दबदबा तिने निर्माण केला आहे.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *