Headlines

महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट, ‘वेड’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अनोख्या विक्रमाची नोंद

[ad_1]

मुंबई : येत्या 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता ब्लॉकबस्टर ‘वेड’ या चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वाहिनीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीने एक अनोखा विक्रम रचला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.

लाखो प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनात स्टार प्रवाह वाहिनीने हक्काचं स्थान मिळवलं आहे. २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता ब्लॉकबस्टर वेड चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने स्टार प्रवाहने एक अनोखा विक्रम रचला आहे. या विक्रमाची नोंद प्रतिष्ठित गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये करण्यात आली आहे. 

मराठी सिनेमा आणि मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. वेड सिनेमात सत्या आणि श्रावणीचं छत्रीसोबत एक वेगळं नातं आहे. त्यामुळेच गिनिज वर्ल्ड रेकॉर्डससाठी सुद्धा छत्रीची निवड करण्यात आली. रितेश देशमुख यांनी या कलाकृतीतील अखेरची छत्री स्वहस्ते ठेऊन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड पूर्णत्वास नेला. सुपरस्टार रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत हा अनोखा विक्रम रचण्यात आला. 

या क्षणाविषयी बोलताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, ‘मराठी सिनेमा हा प्रत्येक मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. वेड सिनेमाने प्रेक्षकांना खरंच वेड लावून दमदार कमाई केली ही या सिनेमाची ताकद आहे. स्टार प्रवाह वाहिनी मराठी परंपरा राखण्याचा कायम प्रयत्न करते आणि म्हणूनच स्टार प्रवाह या महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर महाराष्ट्राचा नंबर वन सिनेमा २० ऑगस्टला घेऊन येतोय. या सिनेमासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस रचत स्टार प्रवाह याअग्रगण्य वाहिनीने जगाच्या नकाशावर नाव कोरलं आहे.’ 

वेड सिनेमाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं. सत्या आणि श्रावणीच्या अनोख्या लव्हस्टोरीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. याच प्रेमाची साक्ष देणाऱ्या भव्यदिव्य हृदयाची कलाकृती साकारून जागतिक विक्रम रचण्यात आला. ही भव्यदिव्य कलाकृती साकारण्यासाठी तब्बल १४४६ छत्र्यांचा वापर करण्यात आला. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही कलाकृती आकारास आली. 

स्टार प्रवाहने वेड सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर निमित्ताने रचलेला हा विक्रम कौतुकास्पद आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने दिलेल्या या मौल्यवान क्षणांबद्दल मी आणि जिनिलिया आभारी आहोत अश्या शब्दात रितेश देशमुख यांनी भावना व्यक्त केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *