Headlines

‘यात काय वाईट…’ ड्रेसवरून कमेंट करणाऱ्या चाहतीला विशाखा सुभेदारचं चोख उत्तर

[ad_1]

Vishakha Subhekar : अनेकदा अभिनेत्रींना त्यांच्या रूपावरूनही प्रचंड ट्रोल करण्यात येते. वजनावरून नकारात्मक प्रतिक्रिया देण्याचाही फंडा हा अद्याप कमी झालेला नाही. त्यातून कोणत्याही अभिनेत्री बिकीनी घातली तरी त्यावर विचित्र कमेंट्स केल्या जातात. यावरही अभिनेत्री सडेतोड उत्तर देताना दिसतात. अभिनेत्री विशाखा सुभेदार हिला देखील अनेकदा तिच्या वजनावरून ट्रोल करण्यात आले आहे. परंतु त्यावरही तिनं योग्य ते उत्तर नेटकऱ्यांना दिलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘फू बाई फू’ असा विनोदी रिएलिटी शो त्याचप्रमाणे अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांतून तिनं काम केली आहेत. त्याचसोबत ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे. सोशल मीडियावरही तिचे फोटो हे चर्चेत असतात. त्यातून सध्या तिच्या एका पोस्टची चर्चा आहे. परंतु सोशल मीडियावर मात्र तिला ट्रोल करण्यात आले आहे. 

आपल्या चाहत्यांना आणि ट्रोलर्सना विशाखा सडेतोड उत्तर देताना दिसते. सध्या अशाच एका ट्रोलरला तिनं योग्य ते उत्तर दिलंय. परंतु काही ट्रोलर्सना मात्र तिचा हा लुक अजिबातच पसंत पडलेला नाहीये. एकानं भली मोठी कमेंट करत लिहिलंय की, ‘मी जे लिहिणार आहे, ते वाचून तू बहुतेक माझा राग करशील पण तुझ्यावर मनापासून प्रेम करते म्हणून न राहावून लिहितेय. खोट्या कमेंट्स वाचून स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस. तू जशी आहेस, तशीच छान आहेस, तू उत्तम अभिनेत्री आहेस, हे तू खूप वेळा सिद्ध केलंय. पण तुला या लूकमध्ये पाहून मनाला त्रास झाला. तू म्हणशील सगळे कौतुक करतायत आणि ही असं का म्हणतेय, पण तुझ्याबद्दल अटॅचमेंट वाटते, त्यामुळे मी लिहिलं तू राग मानू नकोस.’

तेव्हा एकप्रकारे प्रांजळपणे केलेली ही कमेंट पाहून विशाखानंही व्यवस्थित उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, ”तुमच्या भावना समजू शकते, नसेल आवडलं तुम्हाला.. पण यात वाईट काय दिसतंय? ज्याचा तुम्हाला त्रास झाला.. एका डान्स परफॉर्मन्ससाठी तयार झाले होते, त्याचे हे कपडे आहेत, कारण त्यांची मागणी तशी होती.” यापुढे त्या नेटकऱ्यानं अजून एक कमेंट केली आहे. 

 

”मला तुला नाव ठेवायचं नव्हतं, पण मला कदाचित ते नीट मांडता आलं नाही म्हणून तुझा गैरसमज झाला असेल. माझ्या बोलण्याचे तुला वाईट वाटलं असेल तर माफी मागते. पण मी वाईट हेतुने काहीच बोलले नव्हते” त्यावर विशाखा म्हणाली आहे की, ”मला अजिबात वाईट वाटलं नाहीये, खरंच.. मला तुमचं प्रेम समजतं” सध्या तिच्या या फोटोची आणि कमेंट्सची जोरात चर्चा आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *