Headlines

धक्कादायक : ऐश्वर्या रायच्या मेसेजला रिप्लाय दिला अन् पाहता-पाहता गेले 69 लाख! नेमकं काय घडलं?

[ad_1]

मुंबई : सायबर गुन्हेगारांनी प्रयागराजच्या एका शिक्षकाला घरी बसून टेलिग्रामवर कमाईची ऑफर देऊन 69 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. खरंतर या बिझनेसमध्ये लाखोंचा नफा होतो असं सांगून या गुन्हेगारांनी  पैसे जमा केले. याप्रकरणी भावापूर येथील अनुभव श्रीवास्तव यांनी सायबर पोलिस ठाण्यात आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अनुभव श्रीवास्तव यांनी सायबर स्टेशनच्या पोलिसांना सांगितलं की, त्यांना व्हॉट्सअॅपवर टेलिग्रामवरील टास्क पूर्ण करून पैसे कमवण्यास सांगणारा मेसेज आला.

गुन्हेगारांनीा टेलिग्रामवर आयडी तयार केला होता. यानंतर अनुभव यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता, त्यांना टेलिग्रामवरील एक ग्रुपमध्ये जोडलं. यामध्ये इंस्टाग्रामवर पेज ओपन करून त्याचा स्क्रीन शॉट ग्रुपमध्ये शेअर करण्यात आला. यानंतर प्रीपेड टास्क देण्यात आला. हे टास्क अमिताभ आणि ऐश्वर्याच्या नावाने तयार करण्यात आलं होतं. यामध्ये क्रिप्टो चलनाच्या किमतीत झालेली वाढ आणि घसरण यावर क्लिक करून कळवायचं होतं. सुरुवातीला फक्त 5,000 रुपये घेऊन आयडी बनवला गेला आणि नंतर 60,000 रुपये जमा केले गेले.

अकाउंन्ट फ्रिजच्या नावाखाली लाखोंची रक्कम हडप केली
अनुभव सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकला. त्याला चुकीचं टास्क सांगून गुन्हेगारांनी त्याचा आयडी हॅक केला. आयडी बनवण्याच्या नावाखाली 3 लाख 30 हजार आणि नंतर 8 लाख रुपये जमा केले. यानंतर 15 लाख रुपये जमा केले. त्यानंतर टॅक्सच्या नावावर पाच लाख रुपये जमा केले. पैसे परत मागितल्यावर तो म्हणाला की क्रेडिट स्कोअर 100 पेक्षा कमी आहे.नंतर बिझनेसच्या लाभांशासाठी 20 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. अशा प्रकारे अनेकवेळा लाखो रुपये जमा करण्यात आले. एकूण 69.30 लाख 990 रुपये गमावल्यानंतर त्यांनी आता सायबर पोलिसांची मदत घेतली आहे. अनुभवने पंजाबमधील आयसीआयसीआयच्या बँक खात्यात रुपये जमा केले आहेत.

दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवून 9.41 लाखांची फसवणूक केली
दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी महिलेची ९ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. चांदपूर सलोरी येथील रहिवासी अर्चना श्रीवास्तव यांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे कॉलर राजू घोष आणि अली मोहम्मद यांच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना सांगितलं की, सायबर गुन्हेगारांनी फोन करून तो, फायनान्स कंपनी चालवतो असं सांगितलं. या कंपनीत गुंतवणूक केल्यास दुप्पट फायदा होईल. ही योजना काही काळासाठी मर्यादित आहे. गुन्हेगारांनी आधी त्यांच्या बँक खात्यात 6 लाख 45 हजार रुपये जमा केले. यानंतर दोन लाख 96 हजार रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकूण नऊ लाख ४१ हजार रुपयांचा गंडा घातला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *