Headlines

‘वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नका’; पुण्यातील मावळात पालकांचे पाल्यासह आंदोलन

[ad_1]

राज्यातील वीस पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत. शिंदे- फडणवीस सरकारच्या या धोरणाविरोधात वाड्या, वस्ती आणि ग्रामीण भागातील पालकांनी नाराजी व्यक्त केली असून सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. पुण्यातील मावळ परिसरात आदिवासी बांधव राहतात. अशा ठिकाणी वीस पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. त्यामुळं राज्यसरकारच्या धोरणाविरोधात आदिवासी बांधवांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी देखील विरोध दर्शविला आहे.

हेही वाचा- पुणे महापालिकेतील पदांच्या परीक्षेला कागदपत्रांअभावी उमेदवार मुकले

मावळमधील कोथुर्रने, वाघजाई वस्ती येथे पालकांनी पाल्यासह आंदोलन केलं. आदिवासी पालक मोलमजुरी करून मुलांना शिकवत आहेत. आमच्यावर जी वेळ आली आहे, ती मुलांवर येऊ नये अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे. राज्यसरकारने धोरणात बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

हेही वाचा- पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित करत शाळा बंद करू नयेत असं म्हटलं आहे. वाड्या, वस्ती येथील वीस पटा खालील शाळा बंद करू नयेत. शहरात किंवा दूरवर चा प्रवास करून मुलांना शिक्षण घ्यावं लागेल. याच नियोजन सरकार करणार का? गरिबी परिस्थिती असल्याने शिक्षणापासून मुलं वंचित राहतील असं आमदार शेळके म्हणाले आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *