Headlines

हृतिकनं शेअर केलेला ‘तो’ Photo पाहून नेटकरी म्हणतायत Love is in the air

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) स्वत:पेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या सबा आझादला (Saba Azad) डेट करत आहे. काही महिन्यांपूर्वी ते रिलेशनशिपमध्ये आले अशा चर्चा होत्या. दोघेही पहिल्यांदाच एकत्र एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. त्यानंतर त्यांच्या डेटिंगची चर्चा सुरु झाली. त्यानंतर ते दोघे बऱ्याचवेळा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र दिसले. सबा बऱ्याचवेळा हृतिकसोबतचे फोटो शेअर करताना दिसते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच हृतिकनं सोशल मीडियावर सबासोबतचा फोटो शेअर केला आहे. हृतिकनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा : ‘कोणाला माझी काळजी नाही…’, ऋषभ पंतवरून ट्रोल झाल्यावर उर्वशी रौतेलाचं दु: ख आलं समोर

हृतिकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हृतिकनं सबासोबतचा एक फोटो शेअर केला असून सबा एका बेन्चवर विचारात बसलेली आहे तर हृतिकनं तिच्यासोबत एक सेल्फी फोटो क्लिक केला. हा फोटो शेअर करत हृतिकनं एक भन्नाट कॅप्शनही दिलं आहे. त्यासोबत हार्ट इमोटीकॉन त्यानं शेअर केलं आहे. (Hrithik Roshan Shares Throwback Photo With Girlfriend Saba Azad On Instagram Went Viral )

हृतिकच्या या पोस्टवर नेटकरी भरपूर कमेंट करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की, ‘ही कोण आहे बाय द वे?’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, या दोघांची जोडी सुंदर दिसते. 

हृतिकने 2000 मध्ये बंगळुरूमध्ये सुझान खानशी लग्न केले. या जोडप्याला ऋदान आणि रेहान ही दोन मुलं आहेत. 2013 मध्ये हृतिक आणि सुझान विभक्त झाले आणि 2014 मध्ये घटस्फोट घेतला. हृतिक आता सबाला डेट करत असताना सुझानही अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर हृतिकचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ज्यामध्ये सैफ अली खान देखील होता. हा दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक होता, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. आता हृतिकनं ‘फायटर’ची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही दिसणार आहे. दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *