Headlines

VIDEO: “मागून आले काय, मंत्री झाले काय…”, भाजपा मंत्र्यासमोरच आमदार संजय शिरसाटांनी बोलून दाखवली नाराजी | Shivsena rebel MLA Sanjay Shirsat express unhappiness over cabinet expansion

[ad_1]

शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाटांनी एकनाथ शिंदेंचं समर्थन करत ठाकरे कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला. अगदी त्यांच्या कार्यालयातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटोही काढला. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात संजय शिरसाटांना संधी मिळाली नाही. यानंतर शिरसाट नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली. आता स्वतः संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते रविवारी (२१ ऑगस्ट) औरंगाबादमध्ये आपल्या मतदारसंघात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

संजय शिरसाट म्हणाले, “मी अतुल सावेंच्या वडिलांसोबत काम केलं आहे. त्यांच्या वडिलांसोबत काम करताना अतुल सावे राजकारणात येतील असं मला कधी वाटलं नव्हतं. परंतु राजकारणात आला काय, मंत्री झाला काय राज्यमंत्री झाला काय, कॅबिनेट मंत्री झाला काय, सगळंच झालंय.”

“सध्या ज्येष्ठतेचं कुठं काही राहिलंच नाही”

“अरे आमच्याकडेही पाहत जा. सध्या ज्येष्ठतेचं कुठं काही राहिलंच नाही असं वाटायला लागलं आहे,” असं म्हणत संजय शिरसाटांनी खोचक टोला लगावला. यावेळी सभेत एकच हशा पिकला. यातून शिरसाटांनी आपली नाराजी अप्रत्यक्षपणे भाजपा मंत्र्यासमोरच बोलून दाखवली आहे.

“मी तर काही नसताना सगळ्या महाराष्ट्रात टीव्हीवर दिसतो”

संजय शिरसाट पुढे म्हणाले, “माझ्या गल्लीत कचरा उचलला जातो की नाही, माझ्या परिसरात लाईट लागल्या की नाहीत अशा मुलभूत गरजा नागरिकांच्या आहेत. हा त्याला शिव्या देतो, तो याला शिव्या देतो. मला तर खूप कंटाळा येतो. मी तर काही नसताना सगळ्या महाराष्ट्रात टीव्हीवर दिसतो.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “आम्ही नुकतीच ५० थरांची दहीहंडी फोडली”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले…

“एकमेकांची चेष्टा करून किंवा विरोधात बोलून कधीही तुमचं महत्त्व वाढत नाही”

“एकमेकांची चेष्टा करून किंवा एकमेकांविरोधात बोलून कधीही तुमचं महत्त्व वाढत नाही हे लक्षात ठेवा. तुमचं महत्त्व वाढवायचं असेल तर त्याला कामाची जोड असली पाहिजे. मी केलेला रस्ता म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या मतदारसंघासाठी काय केलं याला महत्त्व असलं पाहिजे,” असंही शिरसाटांनी नमूद केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *