Headlines

uddhav thackeray appreciation neelam-gorhe to slam-minister-gulabrao-patil

[ad_1]

“मंत्री असो वा मुख्यमंत्री सर्वांनी सभागृहाचे पावित्र्य पाळायलाच हवे. उद्या मुख्यमंत्री जरी तसे वागले तरी तुम्हाला त्यांचे कान उघडायचं काम करावं लागणार आहे. सभागृहात शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल आपले आभार”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं कौतुक केलं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधिमंडळात आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी झापलं होतं.
नीलम गोऱ्हे लिखित पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते कऱण्यात आलं आहे. या पुस्तकात गोऱ्हेंच्या उपसभापती पदाच्या कार्याचा अहवाल देण्यात आला आहे.

हेही वाचा- “पीक विमा कंपन्या सरकारचे ऐकत नाही”, अशोक चव्हाणांची कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडे तक्रार

“सभागृहाची एक उंची आहे. तिथे कसं वागलं पाहिजे, याचे काही नियम आहेत. मग तो मंत्री असो वा कुणी असो.. सभागृहात आल्यावर त्याने शिस्तीत वागलं पाहिजे. हे खडसावून सांगितलं, शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल तुमचे खरं तर आभार. तो कोण होता, म्हणून तुम्ही त्याला खडसावलं, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देत नाही. तुम्ही ज्या पदावर बसलात त्याला न्याय देताना सभागृहाची उंची पाळून संबंधिताला योग्य शब्दात समज दिली गेलीच पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सुरुवातीला नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या विचारांच्या नव्हत्या

“नीलम गोऱ्हेंना शिवसैनिक होऊन किती वर्षे झाली आठवत नाही. नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या विचारांच्या नव्हत्या. त्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांना मला भेटायचं असल्याचा निरोप एकदा मला मिळाला होता. मी विचार केला त्या तर आपल्या विचारांच्या नाहीत, पण मी त्यांना भेटलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे शिवसेनेत यायचं असल्याची इच्छा व्यक्त केली होती.

हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर पुन्हा टीका; म्हणाले, “गद्दारांना…”

महिलांच्या बाबतीत सर्व पक्षांनी एकत्र यायला हवं

निलम गोऱ्हेंवर एखादा विषय सोपवला आणि त्यांनी अर्धवट सोडला असे कधीच झाले नाही. आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. तो आहेच. दिल्लीत निर्भयानंतर देश हादरला. आज भंडारामध्ये जे घडले ते भीषण आहे. महिलांच्या बाबतीत काही घडले तर पक्ष विसरून सर्वानी एकत्र आले पाहिजे, महिलांबाबत सर्वानी एकत्र यायला हवं असंही उद्धव ठाकरे म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *