Headlines

Vedanta Foxcon Nothing happened during Mahavikas Aghadi Fadnavis msr 87

[ad_1]

राज्यात सध्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’वरून राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. विरोधकांकाडून शिंदे-फडणवीस सरकावर जोरदार टीक केली जात आहे. तर सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यील प्रकल्प बाहेर जात असल्याचे सांगत राज्य सरकारवर टीका सुरू केली आहे. शिवाय, आंदोलनं देखील केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(सोमवार) प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधकांवर निशाणा साधला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात लवकरच पोलिसांची २० हजार पदे भरणार

यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “केवळ नौटकी सुरू आहे. कारण, पहिल्यांदा त्यांना जागा आमचं सरकार आल्यावर आम्ही दाखवली. तोपर्यंत त्यांना जागाही दाखवली नव्हती, कॅबिनेटची बैठकही झाली नव्हती. आम्ही कॅबिनेट सबकमिटीची बैठक घेतली. कारण, आम्हाला जसं लक्षात आलं की ते(वेदान्त) गुजरातला चालले आहेत. त्यांचा जवळजवळ निर्णय होतोय. तेव्हा एक शेवटचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि मी त्यांना पत्रं लिहिली. मी स्वत: दोनदा जाऊन भेटलो. आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला अधिक चांगलं पॅकेज देतो. आम्ही कॅबिनेटची मंजुरी करून त्यांना पॅकेज दाखवलं. आम्ही जागा देखील शोधली.”

याचबरोबर “हे सगळं आमच्या काळात झालेलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात काहीच झालं नाही. हे केवळ तिथे जाऊन नौटंकी करत आहेत, आंदोलनं करत आहेत. पण त्यांना तसंच उत्तर आम्ही निश्चितपणे देऊ आणि आमचं उत्तर हे त्यांच्यापेक्षा जास्त गुंतवणूक आणून आम्ही देऊ.” असंही यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *