Headlines

‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री Adha Sharma चा अपघाता! पोस्ट शेअर करत म्हणाली…

[ad_1]

The Kerala Story Fame Actress Adha Sharma Accident : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तिच्या ‘द केरला स्टोरी’  या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या शालिनी या भूमिकेनं प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. तिचा अव्वल दर्जेचा अभिनय असल्याचे अनेकांनी म्हटले. तर चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेननं केलं. चित्रपटाला यश मिळतानाचे पाहत अदा आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन हे काल 14 मे रोजी हिंदी एकता यात्रेत शामिल होणार होते. या यात्रेत ते करीमनदगर येथून जॉइन होणार होते. पण तिथे पोहोचण्याआधीच त्यांचा अपघात झाला. आता अदानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत हेल्थ अपडेट दिली आहे. 

अदा शर्मानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये अदा म्हणाली की, ‘मित्रांनो मी ठीक आहे. आमच्या अपघताविषयी माहिती मिळातच अनेकांनी आम्हाला मेसेज केले. संपूर्ण टीम आणि आम्ही सगळे ठीक आहोत. गंभीर परिस्थिती नाही. तुम्ही सगळ्यांनी आमच्या विषयी जी चिंता दाखवली त्यासाठी आम्ही आभारी आहोत.’ 

काय म्हणाले होते दिग्दर्शक सुदीप्तो सेन

सुदीप्तो सेन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट करत त्यांच्या रस्ते अपघाताविषयी सांगितले होते. त्यांनी ट्वीट करत सांगितले की आज आम्ही एका युवा सभेत आमच्या चित्रपटांविषयी बोलण्यासाठी जाणार होतो, पण दुर्दैवाने एमर्जंसी समस्या आली आणि त्यामुळे आम्ही प्रवास करू शकलो नाही. करीमनगरच्या लोकांची मी मनापासून माफी मागतो. मुलींना वाचवण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवला आहे. कृपया आम्हाला पाठिंबा देत रहा. #हिंदू एकता यात्रा.

हेही वाचा : Adah Sharma नं आईला मराठीत दिल्या ‘मदर्स डे’च्या खास शुभेच्छा

दरम्यान, द केरला स्टोरी या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटानं 9 दिवसात 100 कोटींचा आकडा पार करत 112.90 कोटींची कमाई केली होती. तर हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा आकडा पार करणार आहे याविषयी सगळीकडे चर्चा सुरु आहे. तर 2023 या वर्षात हा दुसरा चित्रपट आहे ज्यानं 100 कोटींचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेननं केलं आहे तर निर्मिती विपुल शाह यांनी केली आहे. चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धि इडनानी आणि सोनिया बलानी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 30 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *