Headlines

फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास फक्त या टिप्स वापरा, फोन लगेच मिळेल

[ad_1]

जर तुमचा फोन चोरीला गेल्यास काय करावे हे सूचत नाही. त्याची तक्रार कुठे करायची हे सुद्धा ऐनवेळी समजत नाही. कारण, फोन शोधायचा म्हटले तर खूप वेळ जाऊ शकतो. तसेच पोलीस ठाण्यात क्रिमिनल केस केल्यास जास्त वेळ जातो तसेच त्याचे मनावर दडपण सुद्धा येते. परंतु, आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही खास टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन तात्काळ शोधू शकता. पाहा डिटेल्स.

14422 हेल्पलाइन नंबर

जर तुमचा फोन हरवला असल्यास सर्वात आधी तुम्ही १४४२२ या हेल्पलाइन नंबरवर फोन करून सूचना द्यायला हवी. यामुळे फोन लवकर शोधता येऊ शकतो. यानंतर फोनला शोधणे सुरू होते. दूरसंचार मंत्रालयाकडून या सर्विसला देशभरात उपलब्ध करण्यात आले आहे.

वाचा : वाचा : Google Pixel 7a लाँच होताच Pixel 6a झाला स्वस्त, तब्बल १७,००० हून अधिकची सूट

CIRR पोर्टल
दूरसंचार प्रौद्योगिकी केंद्र (सी-डॉट) कडून एक सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर (CIRR) तयार करण्यात आला आहे. यात प्रत्येक नागरिकाचे मॉडल नंबर, सिम नंबर आणि आयएमईआय नंबरची नोंदणी केली जाते. चोरीचा मोबाइल शोधण्यास सरकारी एजन्सी मोबाइल मॉडल आणि IMEI नंबरची माहिती मिळते.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

Mobile Tracking System

सरकारकडून मोबाइल ट्रॅकिंग सिस्टम आणली जात आहे. या सिस्टमला देशभरातील लोकांना एक ऑप्शन मिळतो. यावरून चोरी झालेल्या मोबाइल फोनला ब्लॉक करण्यात येते. या सिस्टमला भारतात १७ मे रोजी लाँच केले जाण्याची शक्यता आहे. याच्या मदतीने यूजर्स आपला हरवलेला मोबाइल फोनला ट्रॅक करण्यासोबत ब्लॉक सुद्धा करू शकतो. या सिस्टमला दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि पूर्वोत्तर राज्यातील काही दूरसंचार सर्कलमध्ये पायलट प्रोजेक्टवर लागू केले जाऊ शकते.

वाचाः Cooler घ्यायचा विचार करताय? ‘या’ साइटवर स्वस्तात मिळत आहेत एकापेक्षा एक कूलर

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *