Headlines

“…तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला एकत्रित करून ‘खंजीर’ चिन्ह द्यायला पाहिजे”, गोपीचंद पडळकरांची जोरदार टीका! | Thackeray group and NCP should be united and given Khanjir symbol Gopichand Padalkar on uddhav thackeray rmm 97

[ad_1]

अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं आहे. यानंतर आयोगानं ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘मशाल’ हे चिन्ह बहाल केलं आहे. दुसरीकडे, शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आयोगाला पत्र लिहिलं आहे. आमच्याबरोबर दुजाभाव केला जात असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या या पत्रानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह देऊन चूक केली आहे. आयोगानं त्यांना ‘खंजीर’ हे चिन्ह द्यायला पाहिजे होतं, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा- Andheri Bypoll: सून अर्ज भरायला गेल्यानंतर रमेश लटकेंच्या वडिलांना अश्रू अनावर, भावुक होत म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राबाबत विचारलं असता गोपीचंद पडळकर म्हणाले, “उद्धव ठाकरेंबरोबर कसला दुजाभाव केला आहे? खरं तर, निवडणूक आयोगाकडे आम्हीच विनंती करायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचं विलीनीकरण करून त्यांना ‘खंजीर’ चिन्ह द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना लोकांमध्ये सहजपणे जाता येईल. कारण ‘मशाल’ चिन्ह रुजवायला त्यांना वेळ लागेल. ‘खंजीर’ म्हटलं तर लोकांच्या लगेच लक्षात आलं असतं.

हेही वाचा- “…तर कानाखाली आवाज काढेन”, संतोष बांगरांचा कृषी कार्यालयात पुन्हा राडा; अधिकाऱ्यांनाही केली शिवागीळ

“मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच खंजीरातून झाला आहे. आता पवारांनी नवीन एक खंजीर घुसवणारा निर्माण केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडूनच चूक झाली, असं मला वाटतंय. मी स्वत: एक पत्र लिहून विनंती करतो की, त्यांचं चिन्ह बदलून त्यांना ‘खंजीर’ चिन्ह द्या. पण तुम्हाला खंजीर चिन्ह मिळाल्यानंतर ते एकमेकांच्यात घुसवू नका, समोरच्यात घुसवा” असा टोलाही गोपीचंद पडळकरांनी लगावला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *