Headlines

T20 WC : रवी शास्त्रींनी सांगितली भारतीय संघासमोरील सर्वात मोठी समस्या; म्हणाले,आयपीएलमधील…

[ad_1]

भारताचे (Team India) माजी मुख्य प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 world cup 2022) भारतीय संघाच्या सर्वात मोठ्या समस्येबद्दल भाष्य केले आहे. खेळाडूंसाठी दुखापतीची डोकेदुखी नवीन नाही आणि आता यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे. जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) दुखापतीमुळे 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लगेचच भारताला दुसरा धक्का बसला. दीपक चहर (deepak chahar) देखील दुखापतीमुळे भारतीय संघातून (Team India) बाहेर पडला आहे. भारतीय संघाकडे सध्या भुवनेश्वर कुमार (bhuvneshwar kumar), अर्शदीप सिंग (arshdeep singh) आणि हर्षल पटेल (harshal patel) हेच वेगवान गोलंदाज आहेत. पण या खेळाडूंना अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही.

मुंबई प्रेस क्लबच्या मीट द मीडिया कार्यक्रमादरम्यान, रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी याबाबात भाष्य केले. “प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी सर्वात निराशाजनक गोष्ट होती ती म्हणजे, जेव्हा तुम्ही तुमचे महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे गमावले. भुवनेश्वर कुमार (bhuvneshwar kumar) जखमी असताना आम्ही दोन वेळा इंग्लंड आणि न्यूझीलंडचा दौरा केला आहे. तो त्या दौऱ्यांवर गेला असता तर त्याला भरपूर विकेट मिळाल्या असत्या. आता दीपक चहरकडे बघा. तो फार कमी सामने खेळला आहे आणि त्याला दुखापत झाली आहे,” असे रवी शास्त्री म्हणाले.

“मी आकडेवारी पाहत होतो, 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपपासून बुमराहने केवळ पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि आता तेही दुखापतग्रस्त आहे. आजच्या काळात किती क्रिकेट खेळले जातं? खेळाडूंच्या कामाचे योग्य पद्धतीने नियोजन होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यांना विश्रांती कधी द्यावी याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष मोठी भूमिका बजावू शकतात. उद्या भारतीय संघाच्या कोणत्याही महत्त्वाच्या खेळाडूला आयपीएलमधील काही सामन्यांसाठी विश्रांतीची गरज असेल तर त्याला ती मिळायला हवी. यामध्ये बीसीसीआय अध्यक्षांना फ्रँचायझींसोबत बसून त्यांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगावी लागेल,” असेही रवी शास्त्री म्हणाले. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *