Headlines

‘तरुणांनी केवळ भजे तळायचे का?’ परराज्यात जाणाऱ्या उद्योगांवरून मनिषा कायंदे आक्रमक, म्हणाल्या “हिंदूविरोधी विशेषण…” | manish kayande criticizes devendra fadnavis bjp and eknath shinde over losing investment

[ad_1]

मागील काही महिन्यांमध्ये टाटा एअरबस, वेदान्त फॉक्सकॉन, सॅफ्रन यासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. याच कारणामुळे सध्या सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. काल (३१ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावर स्वतंत्र पत्रकार परिषदा घेत एकमेकांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटातील नेत्या मनिषा कायंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर खरपूस शब्दांत टीका केली आहे. फडणवीसांच्या प्रत्येक दाव्याला छेद देणारी माहिती आदित्य ठाकरे यांनी काल दिली आहे, असे कायंदे म्हणाल्या आहेत. तसेच उद्योग परराज्यात जात असतील तर येथील तरुणांनी फक्त भजे तळायचे का? असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा >>> एसआरए घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पेडणेकरांना खुले आव्हान; म्हणाले, “संजय अंधारी नावाच्या…”

“जेव्हा प्रश्नाचे उत्तर नसेल तेव्हा पप्पू, छोटा पप्पू, पेंग्विन असे म्हटले जाते. काल गुजरातला जाणाऱ्या उद्योगांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांची चिरफाड केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक दाव्याला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उत्तर नसेल तर समोरच्याची टिंगलटवाळी केली जाते. सत्ताधाऱ्यांकडून हे सूत्र वापरले जात आहे,” असे मनिषा कायंदे म्हणाल्या.

हेही वाचा >>> “…तर पेंग्विननेही डोक्यावर हात मारला असता,” ‘अहंकारी राजा, विलासी राजपूत्र’ म्हणत आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका

“हे बेकायदा सरकार महाराष्ट्राचं नुकसान करणारे निर्णय घेत आहे. आज युवकांनी चहा विकायचा, भजी तळायची का? हे सरकार शिकलेल्या तरुणांना नोकरी कधी देणार? की कवेळ सण उत्सव साजरे करायचे? असं बोललं की आम्हाला हिंदूविरोधी विशेषण लावले जाते. ते युवकांना काम, रोजगार देऊ शकत नाहीत. आज सरकारची निंदानालस्ती होत आहे. सगळे उद्योग गुजरातमध्येच का जात आहेत. हा सगळा कुटील डाव सुरू आहे. यामध्ये फक्त एकनाथ शिंदे यांची निंदानालस्ती होत आहे,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपावर टीका केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *