Headlines

Bacchu kadu reaction on dispute with ravi rana in amravati rally spb 94

[ad_1]

बडनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बच्चू कडू यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दिव्यांग बांधवाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करणार म्हटले होते. दरम्यान, आज बच्चू कडू यांनी अमरावती आयोजित मेळाव्यात भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केले.

हेही वाचा – ‘माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला’ म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठाकरे गटाकडून टीका, म्हणाले “अर्थात, म्हणजे…”

“प्रहार काही आंडू पांडूचा पक्ष नाही, आम्ही संख्येने कमी असलो तरी बाजी आहोत. आम्ही कोणाच्या वाटाल्या जात नाही आणि कोणी वाट्याला गेलं तर त्याचा कोथडा काढल्या शिवाय राहत नाही. विनाकारणा तोंड माराल, तर आम्ही तोंड रंगवल्याशिवाय राहणार नाही, सत्तेची आम्हाला परवा नाही. मी २० वर्ष ३५० गुन्हे घेऊन प्रवास केला आहे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

हेही वाचा – शिवसेनेतील फूट प्रकरणावर २९ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात…

“मी जेव्हा निवडणुकीला बाहेर पडलो, तेव्हा कोणत्या बिल्डराच्या घरी गेलो नाही. आम्ही मंदिर, मशीद, धर्म, जातीचं राजकारण केलं नाही. गोरगरीब, अपंगांसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं, त्यांचा कधी राजकारणासाठी वापर केला नाही. राजकारण आणि तत्त्वांची सांगड घालता आली पाहिजे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – एसआरए घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पेडणेकरांना खुले आव्हान; म्हणाले, “संजय अंधारी नावाच्या…”

“आम्ही छोटा पक्ष असलो, तरी दिलदार आहोत. नाव बच्चू असलं आणि आडनाव कडू असलं तर मी गोड आहे. कितीही खाल्लं तर मधूमेह होत नाही. आज सर्वच पक्षात बंडखोर आहेत. जे बंडखोर आहेत, तेच पहिल्या रांगेत आहेत. जेवढी प्रसिद्धी मला मीडियाने गेल्या काही दिवसांत दिली, तेवढी मला शेतकरी आंदोलनादरम्यान दिली असती, तर पाच-सहा मागण्या मी पूर्ण करून दाखवल्या असत्या”, असेही ते म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *