Headlines

लायन्स क्लबचे सभासदांना बरोबर घेऊन शास्वत काम उभे करा- माजी प्रांतपाल पी एम जे एफ जगदीश पुरोहित

बार्शी – लायन्स क्लब बार्शी, लायन्स क्लब बार्शी चेतना, लायन्स क्लब बार्शी राॅयल, लायन्स क्लब सोलापूर या चार क्लबचे अध्यक्ष सचिव खजिनदार व नविन सभासद यांची झोन ओरिएंटेशन व झोन ॲडव्हाजरी मिटींग रामकृष्ण एक्झिक्युटिव्ह येथे संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित, डॉ शेखर कोवळे, राहुल दोशी हे होते.


लायन्स क्लबचे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्हा स्तरावर व क्लब पर्यंत कामाची संपूर्ण माहिती देताना पदाधिकारी व नविन सभासद यांची जबाबदारी ही समजून सांगत , सर्वांनी एकत्रित येऊन काम उभे केले पाहिजे, इंटरनॅशनल कडून फंड मिळवून आपल्या गावात कायमस्वरूपी चा प्रोजेक्ट उभारणी करा असे आवाहन माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित यांनी केले .

यावेळी शेखर कोवळे, राहुल दोशी यांनीही उपयुक्त असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात झोन सेक्रेटरी संदीप नागणे लायन्स क्लब बार्शी चे अध्यक्ष ॲड विकास जाधव लायन्स क्लब सोलापूर अध्यक्ष गोविंद मंत्री लायन्स क्लब चेतना चे अध्यक्ष ईश्वरी जोशी, लायन्स क्लब बार्शी राॅयल अध्यक्ष गणेश भंडारी यांचेसह चारही क्लबचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी यांनी केले ध्वजवंदना लायन्स क्लब बार्शी चेतना सेक्रेटरी गायत्री बंडेवार यांनी केली पाहुण्यांची ओळख बापूसाहेब कदम अक्षय बंडेवार यांनी केली आभार ॲड विकास जाधव यांनी मानले या कार्यक्रमाच्या वेळी लायन्स क्लब बार्शी च्या वतीने दर्शनी प्रदुषन टाळण्यासाठी च्या संदेश बॅनरचे जगदीश पुरोहित डॉ शेखर कोवळे राहुल दोशी नंदकुमार कल्याणी व मान्यवरांच्या हस्ते अनावरण केले तसेच लायन्स क्लब बार्शी च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर अन्नछत्र मंडळास अन्नदान केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *