Headlines

बार्शी शहराच्या नागरिकांनी विकास कामांबद्दल काळजी करू नये – आमदार राजेंद्र राऊत

बार्शी — बार्शी शहरात सुभाष नगर भागातील प्रभाग क्रमांक १ मधील २ कोटी, ३३ लाख, ९० हजार, ७८१ रुपये किंमतीची विकास कामे, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक २ मधील ८४ लाख, ४३ हजार, ५९५ रुपये किंमतीची विकासकामे व प्रभाग क्रमांक ३ मधील २ कोटी, ३१ लाख, ६८ हजार, ९५८ रुपये किंमतीच्या रस्ते, गटारी आदी विकासकामांचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ राऊत व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी वाणी प्लॉट, सुभाष नगर येथे झालेल्या कॉर्नर सभेत बोलताना आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीकर नागरिकांना विकास कामांबद्दल निश्चिंत रहावे व कोणतीही काळजी करू नये असे आवाहन केले. मागील पावणे पाच वर्षात बार्शी शहर जुने गावठाण व विस्तारित भागात कोट्यावधी रुपयांची रस्ते, गटारी, दिवाबत्ती, बाग-बगीचे, व्यापारी संकुल, स्वच्छता गृहे, गोरगरिबांसाठी घरकुले आदी विकास कामे पूर्ण केलेली आहेत. उर्वरित विकास कामेही लवकरच पूर्ण होतील असा विश्‍वास यावेळी त्यांनी बोलताना दिला. नागरिकांनी ज्या विश्वासाने आम्हांला नगरपालिकेची सत्ता देऊन त्यांची सेवा करण्याची संधी दिली त्या विश्वासाला आम्ही कदापि तडा जाऊ दिलेला नाही. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. थोड्या-फार प्रमाणात काही भागातील विकास कामे ही मागे-पुढे अंतराने सुरु होतील यासाठी नागरिकांनी आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, नगरसेविका सौ.कल्पनाताई गायकवाड, सौ.संगिताताई लांडे, नगरसेवक प्रशांत कथले, बापूसाहेब वाणी, बाळासाहेब लांडे, रामभाऊ जाधव, पांडुरंग वाणी, भारत पवार, आदिनाथ गायकवाड, संतोष भैय्या बारंगुळे, स्थानिक नागरिक बंधू-भगिनीं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *