Headlines

डेनिम वर पैंजण घातलं, म्हणजे गावंढळ म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

[ad_1]

मुंबई : भूत पछाडलं हे ऐकलं की आपल्या सगळ्यांना ‘पछाडलेला’ (Pachadlela)  हा चित्रपट नक्कीच आठवत असेल. या चित्रपटातील थरार पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. या चित्रपटात दुर्गा मावशीची लेक म्हणजेच मनिषा तुमच्या लक्षातच असेल. मनिषाची भूमिका अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीनं साकारली होती. अश्विनी सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर अश्विनी तिचं मत मांडताना दिसते. आता अश्विनीनं शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. 

हेही वाचा : ‘मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळतं…’, रितेश देशमुखच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे एकच खळबळ

अश्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत अश्विनीनं तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अश्विनीनं टी-शर्ट, जीन्स किंवा मग वेस्टर्न ड्रेस परिधान केला असून तिनं काचेच्या बांगड्या घातल्या आहेत. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. या ट्रोलिंगला पाहता अश्विनीनं ही पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. ‘तू डेनिम वर बांगड्या काय घातल्या आहेत?? असा प्रश्न मला नवरात्रीच्या 9 दिवसात सतत विचारला जातो!! का??’ अस अश्विनी म्हणाली. (pachadlela actress ashwini kulkarni on trolling for wearing bengals on denim) 

पुढे अश्विनी म्हणाली, ‘डेनिम मला सुटसुटीत वाटते, दिवस भर काम करताना, गाडी चालवताना या व्यतिरिक्त बरी पडते.. बांगड्या मला आवडतात! सणवार, कार्य असताना आवर्जून घातल्या जातात.. पण नवरात्रीच्या निमित्ताने सलग 9 दिवस त्या हातात ठेवाव्या असा प्रयत्न मी करते आणि माझी डेनिम किंवा माझ्या बांगड्या एक मेकिंवर objection पण घेत नाहीत. फार वर्षांपूर्वी मी हैदराबादमध्ये एका फिल्मी पार्टीला गेले असताना ‘एकाने’ कौतुकाने आणि आठवणीने माझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणला.. 

हेही वाचा : हृतिकनं शेअर केलेला ‘तो’ Photo पाहून नेटकरी म्हणतायत Love is in the air

पुढे अश्विनी म्हणाली, ‘हैदराबदमधील गजरे आणि बांगड्या हा एक स्वतंत्र विषय आहे. मी मीनी स्कर्टमध्ये होते.. पण देणाऱ्याच्या भावना आणि मोगऱ्याच्या सौंदर्याचा मान ठेऊन मी लगेचच तो केसांत माळला आणि खरं सांगते तिथे अनेक नजरा माझ्याकडे कौतुकाने बघू लागल्या.. दक्षिण भारतात वेस्टन लूकवर टिकली, पैंजण, बांगड्या, गजरे सर्रास वापरल्या जातात.. North मध्ये पण मोठे लाल चुडे , बोटभर जाडीच सिन्दुर, आणि डेनिम अशी सरमिसळ खूप बघायला मिळते. आपण मात्र डेनिम वर पैंजण घातलं, म्हणजे गावंढळ… बांगड्या घातल्या म्हणजे काकू बाई.. अशी समजूत करून घेतली आहे.. वावरायला सोपे कपडे परिधान नक्कीच करावेत.. पण त्या बरोबर आपल्या संस्कृती प्रमाणे बांगड्या घातल्या तर बिघडलं कुठे? आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी नका घालू.. पण ज्यांना आवडतं त्यांनी कोणाचीही पर्वा न करता खुशाल घाला…

हेही वाचा : ‘कोणाला माझी काळजी नाही…’, ऋषभ पंतवरून ट्रोल झाल्यावर उर्वशी रौतेलाचं दु: ख आलं समोर

पुढे या विषयी सविस्तर बोलत अश्विनी म्हणाली, ‘हवं ते घालणाऱ्या उर्फी जावेद आणि तत्सम इन्फ्लुएन्सर, पेक्षा हे इन्डो वेस्टर्न कॉम्बिनेशन फारच सुसह्य आहे नाही का. साधारण 2758 बायकांनी मला माझ्या डेनिम आणि बांगड्या बद्दल विचारलं त्या सर्वांसाठी हे सोशल मीडियावरून स्पष्टीकरण!! बांगड्या, पैंजण, टिकली, गजरा कधीही कुठेही कशावरही परिधान करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.. आणि तो मी बजावणारच. वि. सु. वरील प्रकट केलेलं मत हे माझं वैयक्तिक आहे. त्या मागे कोणताही #बांगड्या किंवा #गजरा अशा चळवळी सुरू करण्याचा उद्देश अजीबातच नाही.’ 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *