Headlines

Sunny Deol चा मुलगा करण अडकणार लग्न बंधनात? निवडलाय ‘हा’ खास मुहूर्त

[ad_1]

Sunny Deol’s Son Getting Married : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल लग्न बंधनात अडकणार आहे. करणचा गुपचूप साखरपुडा करण्यात आला होता . तर पुढच्या महिन्यात त्याचं लग्न होणार असल्याचे म्हटले जात आहे. करणने प्रसिद्ध आणि दिवंगत फिल्ममेकर बिमल रॉय यांची पणती दृशाशी साखरपुडा केल्याची चर्चा सुरू होती. पण त्या दोघाचा साखपुडा झालेला नाही. करणच्या आयुष्यात एक दुसरी मिस्ट्री गर्ल आहे. करण ज्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे किंवा लवकरच जिच्यासोबत लग्न बंधनात अडकणार आहे ती चित्रपटसृष्टीतील नाही. 

करणनं ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार, करण आणि त्याची गर्लफ्रेंड यांचा साखरपुडा हा त्याचे आजोबा धर्मेंद्र आणि आजी प्रकाश कौर यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी झाला आहे. करणच्या साखरपुड्याला खूप कमी लोक उपस्थित होते. करण हा 32 वर्षांचा आहे. आता तो त्याच्या एका नव्या जीवणाला सुरुवात करणार आहे. तर त्या दोघांचे लग्न पुढच्या महिन्यात होणार असल्याचे म्हटले जाते. साखरपुड्या प्रमाणे त्यांच्या लग्नात देखील खूप कमी लोक उपस्थित असणार आहेत. 

करणच्या होणाऱ्या पत्नी विषयी बोलायचे झाले तर तिचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. ते दोघं अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. त्या दोघांना व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं दुबईत एतत्र स्पॉट करण्यात आले होते. ती एक मिस्ट्री गर्ल असून तिच्या विषयी खूप कमी लोकांना माहित आहे. करण कोणा सोबत लग्न बंधनात अडकणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर आहेत. 

धर्मेंद्र आणि प्रकाश कौर या दोघांचे लग्न 1954 साली झाले. तेव्हा धर्मेंद्र यांचे वय 19 वर्षे होते. त्यावेळी तर ते चित्रपटसृष्टीत काम देखील करत नव्हते. त्यांना दोन मुलं असून सनी देओल आणि बॉबी देओल अशी त्यांची नाव आहेत. त्यांना दोन मुली देखील आहेत. दरम्यान, मुंबईत शिफ्ट झाल्यानंतर त्यांची भेट हेमा मालिनी यांच्याशी झाली आणि त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं. त्या दोघांना दोन मुली असून ईशा देओल आणि अहाना देओल अशी त्यांची नावं आहेत. 

हेही वाचा : फक्त डोसे करून कमवा 28 लाख रुपये; Shashank Ketkar नं दिली माहिती

दरम्यान, करणच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यानं असिस्टंट दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनं असिस्टंट डायरेक्टरचं पहिलं काम हे यमला पगला दीवाना या चित्रपटात केली होते. तर 2019 साली प्रदर्शित झालेल्या पल पल दिल के पास या चित्रपटातून केले आहे. आता तो लवकरच अपने 2 या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्र दिसणार आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *