Headlines

Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!

[ad_1]

नवी दिल्ली : Smartphone tips and tricks : आजकाल डिजीटल कॅमेरा फार कमी लोक वापरतात. प्रोफेशनल लोक सोडले तर इतर सर्वजण मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यानेच सर्व फोटोग्राफी करतात. पूर्वी घरातील फंक्शन्स किंवा पिकनिकला कॅमेरा वापरला जायचा पण आजकाल सर्वत्र मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यानेच काम होतं, पण त्यामुळे फोनमधून फोटोही तसेच यावे असं वाटत असतं. पण अनेकांकडे बजेटच्या इश्यूमुळे स्वस्तातले फोन असतात, त्यांना वाटतं की फोन स्वस्त असल्यामुळे फोटो चांगले येणार नाहीत. पण मूळात तुमच्याकडे १०-२० हजारांचा फोन असेल तरी तुम्ही भारी फोटो काढू शकता, त्यासाठी सोप्या काही टीप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील… त्याच टीप्सबद्दल जाणून घेऊ…फ्रेम: तुम्ही कोणत्याही वस्तूचा किंवा व्यक्तीचा फोटो घेत असाल तर तो पूर्णपणे फ्रेममध्ये ठेवा. म्हणजेच, वस्तू फ्रेममध्ये योग्यरित्या आली पाहिजे, कॅमेरा ते ऑब्जेक्टपर्यंतचं अंतरही नेमकं हवं.

प्रकाश:
चांगला फोटो काढण्यासाठी तुम्हाला योग्य लाईट म्हणजेच प्रकाशाची काळजी घेणंही आवश्यक आहे. योग्य लाईट नसेल तर फोटो डार्क येऊ शकतो,तसंच अतिप्रकाशातही फोटो बरोबर येणार नाही योग्य लाईट फार महत्त्वाची असते.

दोन्ही हातांचा करा वापर: चांगला फोटो काढण्यासाठी नेहमी दोन हात वापरा जेणेकरून तुमची फोनवरील पकड चांगली होईल आणि तुम्ही ऑब्जेक्ट आरामात कॅप्चर करू शकता.

झूम: फोटो घेण्यासाठी झूम या फीचरचा जपून वापर करा. आवश्यक असल्यासच कॅमेरा झूम करा किंवा फिजीकली तुम्ही फोटो काढणाऱ्या व्यक्ती किंवा गोष्टीच्या जवळ जा, ज्यामुळे फोटो फाटणार नाही.
तसेच स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे मोड वापरुनही तुम्ही आपोआप फोटो अधिक चांगले काढू शकता. आजकाल मोबाईल फोनमध्ये पोर्ट्रेट, नाईट, प्रो आणि स्लो-मो असे अनेक पर्याय आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही चांगले फोटो काढू शकता.

वाचाः iPhone 14 घेण्याची हीच ती वेळ, ऑनलाईनसह ऑफलाईनही मोठी सूट, तब्बल ३०,००० वाचवण्याची संधी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *