Headlines

Shivsena-Sambhaji Brigade Yuti: “…त्यामुळे ही युती नैसर्गिक”; शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया | BJP MLA First Comment on Uddhav Thackeray announces Shiv Sena alliance with Sambhaji Brigade scsg 91

[ad_1]

Sambhaji Brigade and Shivsena Alliance: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाश शिंदे यांनी पक्षामध्ये उभी फूट पाडत ४० आमदारांसहीत भाजपासोबत सरकार स्थापन केल्यापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदारांचा शिंदे गट असा संघर्ष सुरु आहे. एकीकडे शिवसेनेला फुटीच्या राजकारणामुळे गळती लागलेली असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युतीची घोषणा केली. भाजपाने या युतीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड हे दोन्ही पक्ष यापुढे एकत्र काम करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत करण्यात आली. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती देखील नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. मात्र याच युतीवर भाजपाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक शब्दांमध्ये भाजपाच्यावतीने या युतीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ट्विटरवरुन या युतीसंदर्भातील एक फोटो शेअर करत भातळखकरांनी शिवसेनेला शाब्दिक चिमटा काढला आहे. “खोटा इतिहास सांगण्याचे आणि थापा मरण्याचे कौशल्य हा उद्धव ठाकरे आणि ब्रिगेड मधला समान धागा आहे, त्यामुळे ही युती नैसर्गिक आहे,” अशा कॅप्शनसहीत भातखळकरांनी सेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्याची माहिती देणारं कार्ड शेअर केलं आहे.

या युतीसंदर्भात उद्धव काय म्हणाले?
संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. “आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत जे आपल्या विचारांचे आहेत आणि जे आपल्या विचारांच्या जवळपासही येणारे नाहीत असे लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच पुढे त्यांनी, “मी स्वागत यासाठी केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू”, अशी प्रतिक्रिया दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *