Headlines

Celeb Education : लवकरच बाबा होणारा Ranbir Kapoor किती शिकलाय माहितीये का?

[ad_1]

Ranbir Kapoor Education Qualification: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) शमशेरा (Shamshera) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. त्यामुळे आता अपेक्षा आहे ती ब्रम्हास्त्र (Bramhastra) हा चित्रपट रिलीज होण्याची. 

रणबीर कपूर लवकरच बाबा होणार आहे. रणबीरच्या लग्न, करिअरबद्दल अनेक गोष्टी त्याच्या चाहत्यांना माहिती आहेत. पण तुम्हाला हे माहितीये का की रणबीरचं एकूण शिक्षण किती? 

समोर आलेल्या माहितीनुसार त्याच्या कुंटुंबातील सदस्यांनी शालेय शिक्षणही पुर्ण केलेले नाही. रणबीर कपूर हा त्यांच्या घरातील एकमेव सदस्य आहे जो कॉलेजमध्ये गेला. काही मुलाखतींतून रणबीरनं असं सांगितलं होतं की तो आपल्या कुटुंबात सर्वात जास्त शिकलेला आहे. तेव्हा जाणून घेऊया रणबीर कपूरची शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) 

रणबीर कपूरचा जन्म 28 सप्टेंबर 1982 रोजी मुंबईत झाला. त्याची मोठी बहीण रिद्धिमा कपूर एक इंटिरियर आणि फॅशन डिझायनर आहे.

रणबीर कपूरने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता. तो फक्त आईच्या दबावाखाली अभ्यास करायचा. त्याने मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश या शाळेतून शिक्षण पुर्ण केले आहे.

रणबीर कपूर 10वी बोर्डाच्या परीक्षेत सरासरीपेक्षा कमी गुण मिळवून यशस्वी झाला होता. त्यानंतर कपूर कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी आलिशान पार्टीचे आयोजन केले होते. रणबीर कपूरने खुलासा केला आहे की दहावीची परीक्षा उत्तीर्ण (10th exam pass) होणारा तो त्याच्या कुटुंबातील पहिला मुलगा आहे.

रणबीर कपूरने एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स (H R College of Commerce & Economics) मधून प्री-युनिव्हर्सिटी परीक्षा दिल्यानंतर न्यूयॉर्कला गेला. त्याने तिथे असलेल्या स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समधून (School of Visual Arts) फिल्म मेकिंग (Film Making) चा कोर्स केला. त्यानंतर त्याने ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा कॉर्स केला. 

शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर 2005 साली संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ (Black) चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक (Assistant Director) म्हणून रणबीरनं काम पाहिलं आहे. 2007 मध्ये सोनम कपूरसोबत त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘सावरिया’ (Saawariyya) रिलिज झाला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *